कड्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ फुलली

 कड्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ फुलली

------------

बाजारपेठेत आकर्षक विविध साहित्यांची रेलचेल



-----------

राजेंद्र जैन / कडा 

-----------

गणेशोत्सव व गौराई  आगमनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये उत्साहाचे वातावरण झाले आहे. मंडळांसह घरगुती गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली असून, सजावटीच्या विविध आकर्षक साहित्याने कड्याची बाजारपेठ सध्या सजली आहे. बाजारपेठेत विविध आकर्षक साहित्यांची रेलचेल पाहायला मिळत असून खरेदीसाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली आहे.



आज शनिवार दि. ७ सप्टेंबर पासून विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे वाजतगाजत मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे. त्यामुळे कड्याच्या बाजारात गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध आकर्षक साहित्यांची रेलचल वाढली आहे. गणेशासमोर सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या एलईडीच्या विद्युत माळा, फुलांच्या माळा, विविध प्रकारचे रंगबेरंगी फोकस, फॉगलाईट, झुंबर, गणेश मखर, गौरी मंडप, गौराईचे साहित्य, आकर्षक सुबक गणेश मूर्ती, मंडप, गणेशासन, फुलहार आकर्षक पडदे, शो - लटकत, कागदी फुलांच्या माळा, तोरण, फुलदाणी, सुगंधित अगरबत्ती, धूप चंदन हार, आदी पूजेचे साहित्य, डेकोरेशन, यासह अन्य इलेक्ट्रॉनिक्स साहित्यामुळे आदी साहित्यामुळे कड्याची बाजारपेठ सजली असून, हे चित्र पाहून गणेश भक्तांचे डोळे दिपून जात आहेत. काही साहित्यांच्या किमतीत यंदा वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.

-----%%-----



अवघ्या 'एक रुपया' नफ्यावर 'गणेशाची मूर्ती'

-------------

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीसाठी लागणाऱ्या आकर्षक साहित्याने कड्याची बाजारपेठ सजली आहे. येथील गणेश मूर्ती विक्रेते धनंजय मुथा यांनी मागील दोन वर्षापासून 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर मूर्तींच्या खरेदी किंमतीवर अवघा एक रुपया नफा कमवून गणेशाच्या मूर्तीची विक्री करीत आहेत. गणेश मूर्तीच्या किंमतीत कुठलाही नफा कमवायचा नाही. असा संकल्प केला असल्याचे मुथा यांनी सांगितले.

------%%----



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.