अहमदनगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनिल लगड, तर सचिवपदी संदीप रोडे यांची बहुमताने निवड
#उपाध्यक्षपदी सुशील थोरात, चंद्रकांत शेळके
नगर: अहमदनगर पत्रकार संघाच्या चुरशीने मात्र तेव्हढ्याच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह प्रेस फ्रंट (पीपीएफ) पॅनलच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाले आहे. प्रोग्रेसिव्ह प्रेस फ्रंटचे उमेदवार अनिल लगड (दै. सकाळ) यांची अध्यक्षपदी तर संदीप रोडे(दै. पुढारी) यांची सचिवपदी बहुमताने निवड झाली. तसेच कार्यकारिणीसह इतर 17 जागांपैकी 13 पदावर पीपीएफचे उमेदवार निवडून आले. अहमदनगर शहरात लोकशाही मार्गाने झालेल्या पत्रकारांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. खजिनदारपदी पीपीएफ पॅनेलचे सुनील चोभे (दै. नगर सह्याद्री) यांची बिनविरोध निवड झाली होती. गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत पीपीएफ पॅनलचे अनिल लगड -अध्यक्ष, संदीप रोडे -सचिव या पदासह उपाध्यक्षपदी- सुशील थोरात (साम न्यूज), सहसचिवपदी- दौलत झावरे(दै. सकाळ), न्यूज चॅनेल प्रतिनिधीपदी- सुनील भोंगळ(एबीपी माझा), फोटोग्राफर प्रतिनिधीपदी- समीर मण्यार यासह, सर्वसाधारण कार्यकारणीवर- अल्ताफ कडकाले(दै. सकाळ), बाळासाहेब धस(दै. केसरी), राजेंद्र त्रिमुखे (दै. देशोन्नती), सचिन दसपुते(दै. सार्वमत), संदीप जाधव(दै. नगर टाईम्स), सूर्यकांत वरकड(दै. पुढारी) हे सर्व पीपीएफ'चे उमेदवार बहुमताने निवडून आले.
उपाध्यक्ष पदासाठी दोन्ही पॅनल मधील राजेंद्र झोंड आणि चंद्रकांत शेळके यांना समान मते मिळाली. डेमोक्रॅटिक मीडिया फ्रंट(डीएमएफ)चे चंद्रकांत शेळके(दै. लोकमत) यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. डेमोक्रेटिक पॅनेलचे विजय सांगळे(दै. आकर्षण) सहखजिनदार, अरुण वाघमोडे(दै. लोकमत) सर्वसाधारण कार्यकारिणी सदस्य आणि अन्सार सय्यद(फौजदार टाईम्स) साप्ताहिक प्रतिनिधी पदी निवडून आले. चुरशीने मात्र मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या अहमदनगर पत्रकार संघाच्या निवडणुकीत पीपीएफचे वर्चस्व स्पष्ट झाले. दै. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून चोख काम बजावले. त्यांना मतदानकक्ष आणि मतमोजणी प्रक्रियेत श्रीराम जोशी, रावसाहेब पटारे, अरविंद आराखडे, भावसार यांनी मोलाची मदत केली. निवडून आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



stay connected