महाराजांकडून समाजाची जडणघडण करीत प्रबोधनाचे कार्य - मा.आ. भिमराव धोंडे

 महाराजांकडून समाजाची जडणघडण करीत प्रबोधनाचे कार्य - मा.आ. भिमराव धोंडे 




आष्टी प्रतिनिधी 


समाजाची जडणघडण करण्याचे महत्त्वाचे काम संत महंतांनी केले आहे. सध्या किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ह.भ.प. महाराज मंडळी समाज प्रबोधनाचे कार्य करतात असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विघनवाडी येथे केले. 

      शिरूर तालुक्यातील विघनवाडी येथील गोरक्षनाथ गडावर विठ्ठल रुक्मिणी, महादेव बाबा , सिताराम बाबा, मारुती या मुर्तींचा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने विधीवत पूजा करुन प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. याप्रसंगी ह.भ.प. शिंदे महाराज, ह.भ.प‌. डीसले महाराज, सागर धस,  माजी जि. प. सदस्य अशोक सव्वाशे,माजी सभापती केदार, किशोर खोले, माऊली पानसंबळ, आजिनाथ गवळी,कल्याण तांबे, नवनाथ सव्वासे व  इतर उपस्थित होते.

        पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, शिरूर तालुका हा डोंगरी भाग आहे. डोंगरी भागात नाथांचे तसेच संत महंतांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य होते. पुर्वी घरोघरी नवनाथांची पोथी वाचन केली जात होती. पोथी वाचनाने मुलांपासून ते थोरांपर्यंत चांगले ज्ञान मिळत होते. पोथी ऐकण्याने मनातील भिंती दूर होत होती असे मानले जात होते. मी आमदार असताना विघनवाडी येथे दोन सभामंडप दिले होते. यावेळी  माजी जि. प. सदस्य अशोक सव्वाशे, सागर धस व इतरांची भाषणे झाली. राक्षसभुवन तांबा येथे बैल पोळ्याच्या निमित्ताने  राक्षसभुवनकेसरी या भव्य ओपन बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमास मा. आ. भिमराव धोंडे यांनी भेट दिली. शिरूर नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष बाबुराव झिरपे यांचे वडील कै. विश्वनाथ झिरपे तसेच  दहिवंडी येथील  माजी सरपंच आसाराम माने  यांचे वडील कै. मारुती लक्ष्मण माने व निमगाव मायंबा येथील भाऊसाहेब गांजले व दादासाहेब गांजले यांच्या मातोश्री कै. इंदुबाई दगडू गांजले यांचे नुकतेच निधन झाले या तीनही कुटुंबियांच्या  निवासस्थानी भेटी देऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांत्वन केले. याप्रसंगी विविध ठिकाणी माजी जि. प. सदस्य अशोक सव्वाशे, जि. प‌ सदस्य रामदास बडे, याशिनभाई शेख, किशोर खोले, सरपंच ज्ञानदेव केदार, माऊली पानसंबळ, इंजिनिअर  एम. एन. बडे, आजिनाथ गवळी, बारगजे महाराज, भिमराव अवसरमल, अमर माळी,पत्रकार प्रकाश साळवे, रामनाथ शेळके, सुनिल बळे, भिमराव कुर्हे, सुनिल आरगडे, गोकुळ चांदने, डोके टेलर इत्यादी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.