आ बाळासाहेब आजबे यांच्या पुढाकाराने मेहकरी धरण ओव्हरफ्लो.

 आ बाळासाहेब आजबे यांच्या पुढाकाराने मेहकरी  धरण ओव्हरफ्लो. 



              

आष्टी  (प्रतिनिधी) -  आष्टी तालुक्यातील सर्वात जास्त साठवण क्षमता असलेले मेहकरी धरण बुधवारी भरले. सिनाधरणातून  उपसा सिंचन करून या प्रकल्पात आ बाळासाहेब आजबे यांनी कोणताही गाजावाजा न करता योजना कार्यान्वित करून पानी आणले होते .


 

 आष्टी तालुक्यात यावर्षी सगळीकडे चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व लघु मध्यम प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहेत.  सर्वात आधी कडा प्रकल्प भरला,  त्यानंतर एक एक करत सर्व धरणे काठोकाठ भरली.  मेहकरी हे  धरण भरणे मात्र बाकी होते.  आमदार बाळासाहेब आजबे यांनी पंधरा दिवसापूर्वी सिना धरणातून उपसा सिंचनाद्वारे मेहकरीमध्ये पाणी सोडण्याची योजना कार्यान्वित केली होती . हे पाणी आणि मेहकरी नदीतून येणारे पाणी या दोन्हीमुळे बुधवारी मेहकरी धरण भरले. त्यामुळे तालुक्यातील चौदा गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.  सीना धरणात कुकडी प्रकल्पातून ओव्हरफ्लोचे पाणी येते . त्यातील अर्धा टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेने मेहकरी धरणात येते.  सिना धरण मंगळवारी तर मेहकरी धरण बुधवारी असे यावर्षी एकाच दिवसाच्या फरकाने भरले .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.