आष्टी तालुका फोटोग्राफर्स बांधवांनी केले आदर्श गणपती विसर्जन पारंपारिक वाद्यासह बैलगाडीने वेधले आष्टीकरांचे लक्ष.

आष्टी तालुका फोटोग्राफर्स बांधवांनी केले आदर्श गणपती विसर्जन पारंपारिक वाद्यासह बैलगाडीने वेधले आष्टीकरांचे लक्ष.




आष्टी (प्रतिनिधी) बाल वारकरी,भजनी पथक, टाळ मृदुंगाचा निनाद,आणि सजवलेल्या बैलगाडीतून गणरायाची विसर्जन शोभायात्रा या पारंपरिकतेने नटलेल्या आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या गणेश मंडळाने अश्टिकरांचे लक्ष वेधून घेतले.त्यामुळे पहिल्याच वर्षी स्थापना केलेल्या या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



शनिवारी दि. 7 सप्टेंबर रोजी गणरायाची स्थापना झाल्यानंतर गौरी गणपतीच्या बरोबर अनेक बाप्पाचे विसर्जन होत असते.यामध्ये प्रथम वर्ष असलेल्या आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आष्टी शहरात गणरायाची स्थापना करण्यात आली होती.गुरुवारी या मंडळाच्या बाप्पाची विसर्जन शोभायात्रा पार पडली.यावेळी पारंपारिक वाद्ये,सनई तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था पारगाव जोगेश्वरी येथील विद्यार्थी,विद्यार्थिनी यांनी भजन,भारुड,फुगडी आदी माध्यमातून केलेले वारकरी संप्रदायाचे सादरीकरण याने सर्व अष्टिकरांचे लक्ष वेधले तर सजवलेल्या बैलगाडीतून "श्री"ची निघालेली शोभायात्रा यामुळे एक वेगळेच स्वरूप या विसर्जन शोभायात्रेला प्राप्त झाले होते.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आष्टी नगरपंचायत यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी चहा,नाष्ट्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.अत्यंत देखण्या आणि पारंपारिक शोभायात्रेने आष्टीकरांची मने जिंकली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.