माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या प्रयत्नाने...
आष्टी मतदारसंघातील 4 देवस्थानांच्या विकास कामासाठी 16 कोटी रु.मंजूर ..
**************************
भाविक भक्तांना मिळणार मोठ्या सुविधा ...I
******************************
*********************
आष्टी (प्रतिनिधी)
माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघातील..आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र रेणुकामाता देवस्थान बेलगाव,श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव आणि पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र संत मीराबाई गुरु भगवान संस्थान महासांगवी आणि श्रीक्षेत्र आ अश्वलिंग महादेव मंदिर पिंपळवंडी या देवस्थानांच्या विकासासाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास विभागाच्या वतीने 16 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.. याविषयीची अधिक माहिती अशी की,
महाराष्ट्र राज्यातील.." ब " वर्ग दर्जा असलेल्या देवस्थानाच्या ठिकाणी दरवर्षी भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.. अशा देवस्थानांचा विकास करणे बाबत.. ग्रामीण विकास विभाग शासन निर्णय दि.6 सप्टेंबर 20 24 नुसार ..आष्टी तालुक्यातील..श्री क्षेत्र रेणुका माता देवस्थान बेलगाव येथे वाहन तळ 100 लक्ष रु.,
मंदिर परिसर सुशोभीकरण 10 लक्ष रु.
भक्तनिवास 10 लक्ष रु.,संरक्षण भिंत 154 लक्ष रु.,पुरुष भक्त निवास 85 लक्ष रु.
पोहोच रस्ता आणि सीडी वर्क 120 लक्ष रु. आणि पेव्हिंख ब्लॉक 10 लक्ष रु.असे एकूण 4 कोटी 90 लक्ष रु.श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव या ठिकाणी प्रसादालय बांधकाम 200 लक्ष रु.वाहनतळ बांधकाम पेव्हर ब्लॉक व कॉंक्रिटीकरण करणे 200 लक्ष रु. असे एकूण 4.00 कोटी रु. पाटोदा तालुक्यातील..
श्री क्षेत्र संत मीराबाई गुरु भगवान संस्थान महासांगवी या ठिकाणी वाहन तळ बांधकाम 42 लक्ष रु.पुरुष भक्त निवास बांधकाम 100 लक्ष रु. महिला भक्तनिवास बांधकाम 77.20 लक्ष रु.पोहोच रस्ता 20 लक्ष रु.
पोलसह एलईडी लाईट 10 लक्ष रु.स्ट्रीट लाईट 10 लक्ष रु.,संरक्षण भिंत 20 लक्ष रु.आणि सुशोभीकरण 20 लक्ष रु.असे एकूण 3 कोटी रु. तसेच श्रीक्षेत्र अश्वलिंग महादेव मंदिर पिंपळवंडी या ठिकाणी प्रसादालय बांधकाम 82 लक्ष रु.भक्तनिवास 50 लक्ष रु.
संरक्षण भिंत 45 लक्ष रु.पेविंग ब्लॉक बसवणे 80 लक्ष रु.पोहोच रस्ता तयार करणे 90 लक्ष रु.आणि सुशोभीकरण करून लेव्हलिंग पथदिवे बसवणे 63 लक्ष रु. असे एकूण 4 कोटी 10 लक्ष रु. अशाप्रकारे या चार
" ब " वर्ग दर्जातील मोठ्या देवस्थानाचा विकास करण्यासाठी एकूण 16 कोटी रु.अशी घसघशीत रक्कम मंजूर झाली असल्यामुळे..
या ठिकाणी येणार्या भाविक भक्तांना सुविधा मिळणार आहेत...
त्यामुळे ..माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आणि ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन आमदार पंकजाताई मुंडे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत..


stay connected