माजी आ. भीमराव धोंडे यांची चाढ्यवर मुठ, केली ज्वारीची पेरणी
शिरूर तालुक्यातील दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
आष्टी ( प्रतिनिधी ):- माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या शिरूर तालुक्यातील गावभेट दौऱ्याला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या पावसाने काही भागात उघडीप दिली आहे त्यामुळे शेतकरी मशागत व पेरणीच्या कामात गुंतले आहेत. दौऱ्याच्या निमित्ताने हनुमान वाडी येथे शेतात शेतकरी पेरणी करीत असताना खरोखरच शेतकरी पुत्र असलेले आणि शेतीची आवड असलेल्या मा. आ. भिमराव धोंडे यांनी शेतात जाऊन चाढ्यावर मुठ धरुन ज्वारीची पेरणी केली आणि खरोखर शेतकरी पुत्र असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने माजी आ. भीमराव धोंडे यांनी मतदारसंघात गेल्या दिड महिन्यापासून गाव भेटीचा दौरा सुरू केला आहे.
मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व संवाद साधण्यासाठी शनिवारी दिनांक २८ सप्टेंबर रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत शिरूर कासार तालुक्यातील जाटवड, बहीरवाडी , मानूर, हनुमानवाडी , बडेवाडी, बारगजवाडी, शेरेवाडी, उंबरमुळी, लोणी, मांगेवाडी, वारणी,उत्तमनगर, दहिवंडी, रूपूर,गोमळवाडा या गावांचा दौरा केला. ठिकठिकाणी नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच तोफा वाजवत आणि वाजतगाजत स्वागत केले. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बैठकीत पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, गावभेटी दौऱ्याच्या गावात गेल्यानंतर ग्रामस्थ मला विचारतात की, रस्ते व इतर विकास कामातील कमिशनची काय भानगड आहे. वरती मंत्र्याना पैसे द्यावे लागतात का ? त्यावर तुम्ही त्यांनाच विचारा असे सांगून मी कधीच कमिशन घेतले नाही. प्रत्येक विकास कामात दहा ते पंधरा टक्के कमिशन घेतल्यामुळे कामाची गुणवत्ता राहत नाही असे लोक सांगतात. मी वीस वर्षे विधानसभा सदस्य होतो कधीही कोणाकडून कमिशन घेतले नाही. यापुढे चुकीचे काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे जाऊ नका. चांगले काम आणि गुणवत्तेला मी प्राधान्य देतो, लोकांनी गुणवत्ता पहावी गुणवत्त्तेच्या दृष्टीने मी मतदार संघात प्रथम क्रमांकावर आहे. मला सहकार्य करा तुमच्या उपयोगी पडणारा माणूस आहे असे भावनिक आवाहन त्यांनी केले. मतदारसंघातील धनगर समाजाच्या मुलांकरीता आष्टी येथे वसतीगृह सुरू केले आहे.
लोकसभा निवडणुकीत मा . पंकजाताई मुंडे यांच्या साठी सर्वांनी प्रयत्न केले पण आपल्याला यश आले नाही. आतापर्यंत मतदारसंघातील ७० टक्के गावांचा दौरा केला आहे. उर्वरित गांवात लवकरच जाणार आहे. दौऱ्याच्या निमित्ताने शिरूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ. अजयदादा धोंडे, जि.प. सदस्य रामदास बडे, माजी जि.प. सदस्य दशरथ दादा वनवे, उद्योजक लिंबासेठ दादा नागरगोजे,माजी जि.प. सदस्य अशोक सवासे, सरपंच अशोक पाखरे, सरपंच ज्ञानदेव केदार, उपसरपंच अर्जुन बनसोडे, माजी सरपंच विठ्ठल वनवे,अमर माळी, कारभारी कदम, अशोक खोले, रासपा तालुकाध्यक्ष शाम महानोर, बाळासाहेब ढाकणे,सरपंच ज्ञानदेव केदार, शिवाजी बडे, इजि.एम.एन. बडे, डॉ. भास्कर बडे, महारुद्र खेडकर व इतर उपस्थित होते. जाटवड येथील लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अभिवादन केले तसेच हनुमानवाडी येथे शेतात शेतकरी पेरणी करीत असताना माजी आमदार भीमराव धोंडे हे देखील एक निष्ठावान शेतकरी असल्याने पाभरीवर मुठ ठेऊन ज्वारीची पेरणी केली. विविध ठिकाणच्या कार्यक्रमास शेरखान पठाण, अंकुशराव पाखरे, भारत पाखरे, पोपटराव सिरसाठ, अर्जुनराव पाखरे, मोहन महाराज सुरसे, किसनराव बेळगे, संभाजी बडे, गोविंद बेळगे, विलास पाखरे, संभाजी शिंदे, हनुमंत सुरसे , , खलंदर पठाण, अजिनाथ गवळी, साहेबराव बडे, अर्जुनराव बडे, प्रशांत बडे,पांडुरंग बडे, अशोक बडे, काकासाहेब भोसले, जगदीश ढाकणे, शेरखान पठाण,
उपसरपंच ज्ञानोबा देवकाते, कृष्णा सरगर, अभिषेक महारनोर,अभिलाष गाडेकर , किरण महानोर, भाऊराव शेंडगे, बाजीराव शेंडगे, शाहुराव शेंडगे, अशोक सरगर, बाळु शेंडगे, शाहुराव सरगर, शहादेव साबळे, बंडू साबळे, विठ्ठल ठोंबरे,संजय ठोंबरे, वसंत लोखंडे, काशिनाथ नरुटे, माजी सरपंच बाबासाहेब आघाव, गहिनीनाथ बारगजे, नवनाथ बारगजे, ॲड. महादेव बारगजे, वैभव बडे, लक्ष्मण आघाव, रामदास बारगजे, नंदकुमार बारगजे, ज्ञानदेव आघाव, शहादेव बडे, डॉ. बारगजे, संदीप बारगजे, प्रल्हाद बडे, शिवाजी बडे,माजी सरपंच शिलाताई आघाव, माणिकराव बडे, मारुती बडे, महादेव बडे, संजय जगताप, आसाराम बडे, भागवत बडे, रमेश सिरसाठ, शिवाजी बुधवंत, विक्रम बडे, दिपक बडे, मनोज शेलार, रावसाहेब तेळकर, अनिल तेळकर, आकाश जाधव, दत्ता तेळकर, अर्जुन तेळकर,
पत्रकार साळवे, हनुमंत बडे, उपसरपंच ज्ञानेश्वर भुंबे, विठ्ठल येवले, राजेंद्र येवले, प्रभाकर पवार, दत्तो आप्पा सुरे, ह.भ.प.बारगजे महाराज, मधुकर जायभाये, काकासाहेब जेधे, बाबासाहेब वीर, ज्ञानोबा काकडे, बाळासाहेब साळवे, पत्रकार सतीश मुरकुटे, मनोज परदेशी, चांगदेव बापू सुरे, अशोक गर्जे, विलास कातखडे, रमेश सिरसाठ, सावळेराम जायभाये, रमेश सिरसाठ, शहाजी येवले, विलास पवार, माऊली पवार, महादेव आंधळे, प्रभास पवार, बिभिषण बहादुर्गे, छत्रु नेटके व इतर उपस्थित होते.
stay connected