हातोला येथे बिबट्याने घरासमोर बांधलेली शेळी केली ठार..
आष्टी तालुक्यातील हातोला येथील शेतकरी नजर शेख यांच्या घरासमोर 2 शेळ्या बांधलेल्या होत्या, रात्रीच्या वेळी सर्वजण झोपी गेलेले असताना रात्री बिबट्याने एक शेळी जाग्यावरच ठार केली आहे . शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून नजर शेख यांना जाग आली , उठल्यावर पाहताच तो पर्यंत बिबट्याने एक शेळी मारली होती.. भयभीत झालेले शेख कुटुंब यांनी आरडाओरड करताच शेजारी मदतीला धाऊन आले मात्र बिबट्याने तेथून धूम ठोकली, या प्रकारामुळे हातोला परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . या ठिकाणी पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामजिक कार्यकर्ते पोपट गर्जे केली आहे.
stay connected