आष्टी मतदारसंघाला भिमराव धोंडे यांच्या नावाची गरज - बोधले महाराज

 आष्टी मतदारसंघाला भिमराव धोंडे यांच्या नावाची गरज 
 - बोधले महाराज


 सत्याचा विजय होत असतो - विठ्ठल महाराज
 शेतीपुरक उद्योग उभारावेत -भिमराव धोंडे 






आष्टी प्रतिनिधी 


आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघाला भिमराव धोंडे यांच्या नावाची गरज आहे. एवढ्या ताकदीचे व्यक्तीमत्व मतदारसंघात दुसरे नाही.  शेतकरी आणि शिक्षण या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे माजी आमदार भीमराव यांचा श्वासोच्छ्वास आहे असे ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी सांगितले . आपण मतदारसंघासाठी  मोठे कार्य केले आहे याचे फळ निश्चित मिळेल. सत्य सत्यच असते, सत्याचा विजय होत असतो असे ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, लोकसंख्येच्या तुलनेत आज प्रत्येक व्यक्तीला सरासरी दोन ते तीन एकर जमिन मिळू शकते, भविष्यात ही परिस्थिती गुंठ्यांवर येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्ञान आत्मसात करीत शेती पुरक उद्योग उभारावेत.

          वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालय आष्टी यांच्या वतीने व शेतकऱ्यांचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शनाचा गहिनीनाथ गडाचे मठाधिपती हभप विठ्ठल महाराज शास्त्री व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी समारोप झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजक माजी आमदार भीमराव धोंडे हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर  स्वागताध्यक्ष भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, चेअरमन राजेश धोंडे,अभयराजे धोंडे,विठ्ठल आण्णा बनसोडे, जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, जेष्ठ संपादक प्रा. अनंतराव हंबर्डे, ह.भ.प. दिनकर तांदळे महाराज, रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, संजय कांकरिया, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, भाऊसाहेब सायंबर, दिलीपराव काळे,बाजीराव वाल्हेकर,  बाजार समितीचे संचालक आण्णासाहेब लांबडे,माजी गटशिक्षणाधिकारी श्रीराम टेकाळे, व इतर उपस्थित होते. 

           प्रमुख पाहुणे म्हणून पुढे बोलताना हभप प्रकाश महाराज बोधले यांनी सांगितले की, सरकारी योजना कशा राबवाव्यात हे महाराजांकडून शिकावे. कृषी क्षेत्रात स्वामिनाथन यांचे नांव लौकिक आहे. कृषी प्रदर्शन पाहून  शेतकऱ्यांची भावना बदलून अनेकांना कृषी पुरक व्यवसाय करण्यासाठी मत परिवर्तन होईल. खेळ पैठणीच्या कार्यक्रमाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, प्रत्येकाने एकदा तरी आपल्या सौभाग्यवतीला पैठणी घ्यावी. सर्वसामान्य लोकांना रोख स्वरूपात मदत नको तर शिक्षणाच्या माध्यमातून भिमराव धोंडे मदत करतात. त्यांनी शिक्षणासोबत नाळ जोडलेली आहे. युवा नेते अजयदादा धोंडे यांच्या विषयी बोलताना बोधले महाराज म्हणाले की, ते होतकरू युवा नेते आहेत त्यांना धोंडे हे नांव कायम पुढे न्यायचे आहे. भविष्यात तुम्ही यशस्वी व्हाल असे आशिर्वाद दिले.

     अध्यक्षपदावरुन बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की,  वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राची ओळख निर्माण झालेली आहे. साधु संतांनी देखील शेतीचे महत्व सांगितले आहे. शेतीवर प्रकाश टाकण्यासाठी कायमच वारकरी संप्रदायाने काम केले  डॉ. स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील कामामुळे त्यांची जगभरात ख्याती आहे. त्यांनी जादा उत्पादन देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाच्या जातीचे संशोधन केले. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी देखील एक हजार शास्त्रज्ञांना कामाला लावून असे संशोधन करा की ज्यातून कमी पाण्यावर,कमी कालावधीत ज्यादा उत्पन्न कसे मिळेल यासाठी  काम करावे. पुढील दहा वर्षात सर्वच पिकांची उत्पादन क्षमता वाढलेली दिसेल असे बियाणे  भविष्यात येईल.  कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांनी उभारावेत. महाराष्ट्राच्या अनेक भागातून कृषी प्रदर्शनासाठी स्टॉल आले होते. राज्यातील सर्वात मोठा सांगली येथील खिल्लार जातीचा बैल देखील आला होता.  हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली या भावी पिढीला प्रदर्शनाचा  भविष्यात निश्चित फायदा होईल. आपला मतदारसंघ हा ऊस तोडणी कामगारांचा  आहे. मला नेहमी वाटते की आपल्या भागातील लोकांची ऊस तोडणी पासून मुक्तता होऊन  त्यांचे भविष्य चांगले झाले पाहिजे. यासाठी मी नेहमी प्रयत्न करतो. शिक्षण क्षेत्रात थोडेफार  काम केलेले आहे. भविष्यात आणखी करायचे आहे आणि ऊसतोड कामगारांचे जीवन बदलण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हभप विठ्ठल महाराज शास्त्री यांनी सांगितले की, डॉ. स्वामीनाथन यांचे  देशातील शेतकऱ्यांसाठी मोठे योगदान आहे. त्यांनी जादा उत्पन्न देणारे विविध पिकांचे वाण शोधून काढले. मा आ भिमराव धोंडे यांनी गहिनीनाथ गडाच्या दिंडीला सुरुवातीला श्री क्षेत्र अरण

येथे दोन हजार रुपये दिले होते, त्यानंतरच्या वर्षी केळीचा नाष्टा दिला आणि त्यानंतरच्या वर्षांपासून ते गहिनीनाथ गडाच्या दिंडीतील लाखों वारकऱ्यांना जेवण देतात. त्यामुळे भिमराव धोंडे यांना गहिनीनाथ महाराज व वामन भाऊ यांचे आशिर्वाद आहेत. शेतकऱ्यांसाठी दिल्ली पर्यंत पायी गेले. कृषी प्रदर्शनाची सर्वत्र चर्चा झाली आहे.आपण हे मोठे कार्य केले आहे याचे फळ निश्चित मिळेल. सत्य सत्यच असते, सत्याचा विजय होत असतो.

यावेळी स्वागताध्यक्ष व अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, आपला भाग दुष्काळी आहे, यंदा चांगला पाऊस झाला आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने निसर्गाने चांगली साथ दिली. महिलांसाठी आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमास तीन हजारांवर महिलांनी 

हजेरी लावली. आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी धोंडे साहेब विधानसभा निवडणुक लढविणार आहेत त्यासाठी आपण सर्वांनी पाठीमागं उभे राहण्याची गरज आहे.

प्रा‌. अनंतराव हंबर्डे यांनी सांगितले की,मा आ भिमराव धोंडे यांच्या  श्वासात शेतकरी आणि शेतकरीच आहेत. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालतात. डॉ. स्वामिनाथन यांनी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले.  भिमराव धोंडे यांच्या शेतकरी संस्थेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. शेतकरी कधीच बेइमानी करीत नाहीत. मी पहिल्या निवडणुकीपासुन त्यांच्या सोबत आहे आणि उद्याही मी त्यांच्या सोबत राहणार आहे. त्यांच्या हातून एकदा चुक झाली आहे, त्यातून शिकायचे असते असेही सांगितले.पांडुरंग नागरगोजे  यांनी सांगितले की, माजी आमदार भीमराव धोंडे यांचा स्वभाव सरळ आणि शांत आहे. काही लोक त्यांच्या शांत स्वभावाचा फायदा घेतात. हा स्वभाव आता बदलावा आणि भविष्यात काहींची चा़ंगलीच जिरवा असे सांगितले.तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले की, कृषी प्रदर्शनामुळे मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडली. त्यांना नवनवीन माहिती मिळाली. यातून शेतकरी समृद्ध होण्यासाठी मदत होईल ‌ माजी आमदार भीमराव धोंडे यांनी प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे चांगल्या प्रकारचे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात यावे.  रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांनी भिमराव धोंडे यांचा भावी आमदार असा उल्लेख केला. यावेळी कु. भक्ती गिरी या विद्यार्थ्यांनीने देखील उत्कृष्ट भाषण केले. कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव देशमुख, डॉ . विश्वास मुळे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,, ग्रा. पं. सदस्य आदेश निमोनकर, युवा नेते आस्ताक शेख, हादी शेख,, रघुनाथ शिंदे, बाबुराव कदम, विठ्ठलराव लांडगे, डॉ. मनोज पाचे, माजी सभापती अनिल जायभाय, सदाशिव दिंडे, सेवानिवृत्त पीएसआय शेख,बबन सांगळे,  कुंडलिक आस्वर, कोंडीबा साबळे यांच्या सह, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ बी राऊत, प्रा. शिवदास विधाते, माऊली बोडखे, संजय शे़डे तसेच  शेतकरी व कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य श्रीराम आरसुळ यांनी सांगितले की, एक लाख तीन हजार शेतकऱ्यांनी भेटी दिल्या तसेच तालुक्यातील सुमारे 55 शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भेटी दिल्या तसेच जवळपास 10 कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्याचप्रमाणे चार ट्रॅक्टर व एक फवारणीचे ब्लोअर विकले गेले. विविध प्रकारचे एकुण 110 स्टाॅल सहभागी झाले होते. स्व. बापुराव धोंडे या़च्या स्मरणार्थ कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे व प्रा. खेमकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. पी. आर. काळे यांनी मानले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.