आष्टी विधानसभा मतदार संघातून प्रा.माधव साके यांना उमेदवारी द्यावी-सचिन बप्पा गोंदकर
शाहनवाज पठाण - प्रतिनिधी :- आगामी विधानसभा निवडणुकीत आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रा.माधव साके यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आष्टी तालुका सरचिटणीस सचिन बप्पा गोंदकर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रा.माधव साके यांना शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या हे जवळून माहिती आहेत.आत्ता पर्यंत प्रस्थापित पुढाऱ्यांनी मतदात संघातील जनतेची खोटी आश्वासने देऊन फक्त दिशाभूल केली आहे.कोट्यावधी रुपयांचा निधी येऊनही उन्हाळ्यात टॅंकर चालू असतात.कित्येक ठिकाणी पाणी विकत प्यावे लागते आहे.मतदार संघात समस्यांचा डोंगर उभा असून यासाठी एका युवा नेतृत्वाची गरज असून प्रा.माधव साके पर्याय म्हणून दिसत आहे.2011 पासून चळवळीत काम करणारे सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे कुठलाही राजकीय वारसा नसताना मतदार संघात निष्ठेने जनसेवा करणारे प्रा.माधव साके यांच्या पाठीमाघे खंबीरपने उभे राहून मतदार संघातील सर्व विस्थापितांनी एकत्र येऊन प्रस्थापितांना हद्दपार करावे.पक्षश्रेष्ठी यांनी प्रा.माधव साके यांना उमेदवारी देऊन निष्ठेला न्याय द्यावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आष्टी तालुका सरचिटणीस सचिन बप्पा गोंदकर यांनी केली आहे.



stay connected