शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष शिवाजी सुरवसे यांना बंधू शोक
शेतकरी कामगार पक्षाचे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी सुरवसे यांचे जेष्ठ बंधू आसाराम बाबुराव सुरवसे यांचे बुधवार दि . ४ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्यावर पुंडी ता आष्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. पुंडी येथे मेहेकरी नदी तिरावर होणार आहे या प्रसंगी हभप संतोष महाराज मोरे आळंदीकर यांचे प्रवचन होणार आहे . आसाराम सुरवसे यांच्या पश्चात पत्नी मुले मुली सुना नातवडे असा मोठा परिवार आहे .




stay connected