* *जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा नंबर 1शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी योगेश अर्जुन कर्डिले तर उपाध्यक्षपदी नमिता दीपक कर्डिले यांची निवड*
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा च्या शैक्षणिक वर्ष 2024 ते 27 कालावधी करता शाळा व्यवस्थापन समितीची निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश अर्जुन कर्डिले तर उपाध्यक्षपदी नमिता दीपक कर्डिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन सदस्य निवडी करता जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शैक्षणिक वर्ष 2024 ते 27 करिता शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पदी महिला सदस्य नमिता कर्डिले, शुभांगी देवकर, राणी ओव्हाळ,शारदा भाऊसाहेब बोकेफोड, शालन वाघुले, शाहिस्ता सय्यद नूर सय्यद तर पुरुष सदस्य म्हणून योगेश कर्डिले,सय्यद सिद्दीक सय्यद अली नागेश नवनाथ कर्डिले,प्रकाश खेडकर, अशोक भिमराव कर्डिले, मोहन सिंग परदेशी यांची निवड करण्यात आली. सदस्य निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी शाळा व्यवस्थापनाच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संपत कर्डिले परमेश्वर कर्डिले नागेश कर्डिले अनिल तात्या ढोबळे व शिक्षक पालक संघ तसेच माता पालक संघ सदस्य उपस्थित होते.
सदस्य निवड प्रक्रिया पूर्ण करण्याकरता ज्येष्ठ शिक्षक आदिनाथ गव्हाणे अंकुशराव रामगुडे प्रशांत दगडे सर्व वर्गशिक्षक यांनी सहकार्य केले. प्रशालेचे मुख्याध्यापक अर्जुनराव पाचरणे नवनिर्वाचित सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे स्वागत केले व आभार मानले.
शाळेच्या भौतिक समस्या विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकासाकरिता
कटिबद्ध राहू असे अभिवचन यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश अर्जुन कर्डिले यांनी दिले.



stay connected