अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील गावात पथ संचलन गणेश उत्सव सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा - सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे

 अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील गावात पथ संचलन 
गणेश उत्सव सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा - सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे






आष्टी प्रतिनिधी - अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील ८४ गावात गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा होत आहे. गणेशोत्सव शांततेत व आनंदात पार पाडवा यासाठी अंभोरा पोलीस स्टेशन मार्फत महत्वाच्या गावांमध्ये पोलिसांचे पथसंचलन करण्यात येत आहे.  धानोरा, धामणगाव, दौलावडगाव, अंभोरा आदी गावांमध्ये पथसंचलन करण्यात आलेे. या काळात अंभोरा पोलिसांनी मंडळाला

गणेशोत्सव सुरक्षित पार पाडणेकरिता सार्वजनिक गणेश मंडळानी पोलीस स्टेशनची परवानगी घेऊन शानसनाच्या नियम व अटी प्रमाणे उत्सव साजरा करावा. गणेशोत्सव साजरा करण्यापाठीमागील उद्देश काय होता याची जाणीव ठेवून समाज उपयोगी कार्य करावे, रक्तदान शिबीर, गरजू विद्यार्थ्यांना मदत, प्रवचन, कीर्तन, जनजागृती शिबीर, आरोग्य सुविधा शिबीर, महापुरुष व्याख्यान, अन्नदान, संस्कार शिबीर, समाज प्रबोधन, गावाच्या सुरक्षितेसाठी cctv बसविणे इत्यादी सामाजिक उपक्रम राबविण्यास प्रथम प्राधान्य द्यावे. गणेशोत्सवा दरम्यान अथवा मिरवणुकीत कोणतेही अश्लील गाणे, चित्रपटातील गाणे लावून त्यासमोर अश्लील नृत्य केले जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. सुप्रीम कोर्ट व शासनाच्या निर्देशाप्रमाणे ७५ डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे कोणतेही वाद्य, ध्वनीक्षेपक लागणार नाही. इतर जाती, धर्माच्या भावना दुखावतील असे कोणतेही गाणे अथवा भाष्य करू नये. डीजे, डॉल्बीच्या मोठ्या आवाजामुळे वयस्कर व्यक्ती, आजारी व्यक्ती यांचे आरोग्यावर  दुष्परिणाम होतं असून हृदय आजाराचे प्रमाण वाढत आहे. लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हानिकारक आवाजाचे साउंड सिस्टीम लावण्यापेक्षा पारंपारिक वाद्य लावण्यास प्राधान्य द्यावे. आपले मागील हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करुन आपल्या उदात्त व आदर्श संस्कृती प्रदर्शन करावे. थोडक्यात आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये. 

आपण अंभोरा पोलीस स्टेशन मार्फत प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाच्या सुरक्षेसाठी दत्तक योजने अंतर्गत पोलीस, अंमलदार, होमगार्ड यांना नेमूण त्या मंडळाची सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

आपण शासनाने दिलेल्या नियम व अटींचे पालन करावे असे आवाहन अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.