अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल लगड यांचा तेजवार्ता कडून सत्कार
आष्टी ( प्रतिनिधी ) -
अहमदनगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अहमदनगर सकाळ चे संपादक अनिल लगड यांची निवड झाल्याबद्दल तेजवार्ता न्यूज नेटवर्क च्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी तेजवार्ताचे मुख्य संपादक बबलूभाई सय्यद , माजी सरपंच राजाभाऊ शेळके , शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव सुरवसे , ग्रा प सदस्य संतोष शेळके , शेख हमजान आदी उपस्थित होते . अहमदनगर पत्रकार संघाच्या निवडणूकीत अनिल लगड यांनी बाजी मारली व ते अध्यक्षपदी निवडून आले ही आष्टी तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे . अनिल लगड हे गेली अनेक वर्षे अहमदनगर येथे लोकमत चे संपादक म्हणून कार्यरत होते तर आता ते अहमदनगर सकाळ च्या संपादक पदी कार्यरत आहेत . अतिशय शांत , सरळ , मनमिळावू व हसमुख असे हे व्यक्तीमत्व सर्व पत्रकारांना तसेच सामाजिक , राजकिय , शैक्षणिक , अधात्मीक , सांस्कृतीक क्षेत्रातील लोकांना सुपरिचीत आहेत . सर्वच क्षेत्रात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे . त्यांच्या निवडी बद्दल आष्टी तालुक्यातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे . कडा येथेही आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद ढोबळे तसेच डॉ . महेश नाथ व डॉ . भळगट यांनीही अनिल लगड सर यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या .
अहमदनगर पत्रकार संघाच्या चुरशीने मात्र तेव्हढ्याच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह प्रेस फ्रंट (पीपीएफ) पॅनलच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाले आहे. प्रोग्रेसिव्ह प्रेस फ्रंटचे उमेदवार अनिल लगड (दै. सकाळ) यांची अध्यक्षपदी तर संदीप रोडे(दै. पुढारी) यांची सचिवपदी बहुमताने निवड झाली आहे. तसेच कार्यकारिणीसह इतर 17 जागांपैकी 13 पदावर पीपीएफचे उमेदवार निवडून आले. अहमदनगर शहरात लोकशाही मार्गाने झालेल्या पत्रकारांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.




stay connected