लाडक्या 'गौराईंचे' सोनपावलांनी घराघरात आगमन
----------------
गौराईंच्या स्वागतासाठी गृहलक्ष्मींची लगबग
---------------
राजेंद्र जैन / कडा
-------------
गणपती बाप्पांच्या आगमनाची जशी उत्सुकता असते, तशीच गृहलक्ष्मीला गौराई आपल्या घरी येण्याची ओढ लागलेली असते. विघ्नहर्ता बाप्पांच्या पाठोपाठच सोनपावलांनी लाडक्या गौराईंचे मंगळवारी घराघरात मोठ्या उत्साहात आगमन झाले.
श्रावण महिना म्हटला की, सण- उत्सावांची बख्खळ मेजवानीच असते. घराघरात चैतन्यमय वातावरण, धार्मिक उत्साह मन प्रसन्न करुन टाकणारा असतो. गणपती बाप्पांच्या आगमनाची जशी उत्सुकता असते, तशीच घरातील गृहलक्ष्मीला लाडक्या गौराईचे स्वागत करण्यासाठीची ओढ असते. सोनपावलांनी आलेल्या गौराईच्या स्वागताची
सुवासिनींडून जय्यत तयारी करण्यात येते. विधूत रोषणाई, आकर्षक सजावट, अलंकार, आवडीच्या पत्री, फुले, गुलाब, शेवंती, निशिगंध फुलांचे हार, फराळ पदार्थ बनविण्याची लगबग, त्यामुळे गौराईच्या आगमनाचा उत्साह, घराघरात दरवळणारा सुगंध, भक्तिमय वातावरण सर्वकाही आनंदायी असतं. या उत्सावानिमित्त एकाहून एक आकर्षक गौरी सजावट साकारण्याचे कसब पाहायला मिळते. गौराईची सजावट करण्यात महिलांची मात्र धावपळ दिसत असते.
----%%%------


stay connected