Beed Railway Station वर नामकरणाचा बॅनर लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल


बीडच्या रेल्वेस्टेशनवर नामकरणाचा बोर्ड लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल

Beed railway station



बीड (प्रतिनिधी)- बीड शहरापासून जवळच असलेल्या पालवण शिवारातील (Beed Railway Station) रेल्वे स्टेशनवर गैरकायद्याची मंडळी जमवून स्टेशनच्या इमारतीवर विना परवाना बेकायदेशिररित्या अतिक्रमण करून नामकरणाचा बोर्ड लावल्या प्रकरणी पाच ते दहा जणांविरूध्द (Beed Police) बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.



Beed येथील पालवण चौकाच्या पुढे असलेल्या (Nagar Beed Railway Station) रेल्वेस्टेशनच्या इमारतीवर नामकरणाचा बोर्ड लावण्यात आला होता. या प्रकरणात अहमदनगर येथील मध्य रेल्वेचे इंजि. अमरकुमार गणेश प्रसाद यादव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अनोळखी पाच ते दहा पुरूष व महिला यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून रेल्वे स्टेशनच्या बांधकामाच्या इमारतीवर विना परवाना बेकायदेशिररित्या अतिक्रमण करून नामकरणाचा बोर्ड लावला. या तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांविरूध्द कलम १८९ (२), २२३ भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम १२० मपोका १९५१ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याची माहिती  पोलीसांकडून मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुकलारे करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.