जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी घेतायत संगणकाचे धडे
आष्टी प्रतिनिधी
समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील २२७३ शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या असून प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोग शाळेसाठी एक इन्स्ट्रक्टर सुद्धा रुजू करण्यात आलेले आहे, आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते शिकावं पण लागेल हे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ,राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर विमला मॅडम यांनी आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी)हा उपक्रम राबविण्याचे योजिले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील १०१ शाळेमध्ये हा उपक्रम चालु असुन, अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, श्रीमती. आर विमला मॅडम यांच्या सुचनेप्रमाणे व बीड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री.भगवान फुलारी सर (प्रा.) यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात येत आहे, तर येणाऱ्या काळात या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार आहे.


stay connected