संस्कार लाड सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करणार

 संस्कार लाड सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करणार



आष्टी ( प्रतिनिधी ) - आष्टी शहरातील छत्रपती शाहू महाराज निवासी दिव्यांग विद्यालयात दिव्यांग व निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करुन शुक्रवार दि. १६ आॕगस्ट २०२४ रोजी १८ वा वाढदिवस संस्कार राजेंद्र लाड साजरा करणार आहे. या दिवशी संस्कार लाड हा कसलाही सत्कार, शाल, श्रीफळ, हार न स्विकारता दिव्यांग बांधवांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करणार असून ही वडलोपार्जित परंपरा कायम सुरु ठेवणार आहे. तसेच संस्कार लाड हा सामाजिक भान राखून मागील दोन वर्षापासून सातत्याने सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करत आहे.

    आपण ही समाजाचे काही तरी देणे लागतो, या उद्दात हेतूने संस्कार लाड हा समाजसेवा करत आहे. समाजसेवेचा वारसा त्याने आपल्या वडिलांकडून घेतलेला आहे. त्याचे वडिल राजेंद्र लाड हे राज्यपुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक असून ते नेहमीच शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय, धार्मिक, साहित्य व दिव्यांग क्षेत्रातील कार्यात सततच अग्रेसर असतात. त्यांचाच वारसा घेवून संस्कार लाड हा ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सामाजिक कार्य करत असतो. संस्कार हा त्याच्या वाढदिवसानिमित्त वायफट खर्च न करता अनाथ, मतिमंद, दिव्यांग निवासी शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करुन मित्र परिवार, बालगोपाळ यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करणार आहे.

          सध्या सर्वत्र धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच वाढदिवस अतिशय धुमधडाक्यात केले जात आहेत. यासाठी मोठा खर्च करण्यात येत आहे. अतिरेकी सजावट, फटाके वाजवणे, डिजे असा खर्च करण्याची सध्या चढाओढ निर्माण झाली आहे. मात्र सामाजिक आत्मभान ठेवून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करणे प्रमाण कमी झाले आहे. माझा प्रत्येक वाढदिवस समाजोपयोगी व्हावा यासाठी मी प्रयत्न करतोय, त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, आपण देखील आपला वाढदिवस अश्याच सामाजिक कार्यातून साजरा करावा असेही शेवटी संस्कार लाड यांनी सांगितले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.