Dahihandi उद्या आष्टीत रंगणार महादहीहंडी उत्सव : मोठ्या संख्येने उपस्थित रहा --युवा नेते जयदत्त धस

 Dahihandi उद्या आष्टीत रंगणार महादहीहंडी उत्सव : मोठ्या संख्येने उपस्थित रहा --युवा नेते जयदत्त धस 

***************************





**************************

आष्टी (प्रतिनिधी) 

आष्टी शहरात उद्या बुधवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य दहीहंडी महोत्सवास आष्टीसह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवानेते जयदत्त सुरेश धस यांनी केले आहे.

            आष्टी शहरातील पंचायत समिती प्रांगणात बुधवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता युवा नेते जयदत्त धस मित्र मंडळाच्यावतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवासाठी माजीमंत्री सुरेश धस यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लावण्यतारका मानसी नाईक, सिने अभिनेत्री सई मांजरेकर, झेबा शेख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर या महोत्सवामध्ये डीजेच्या तालावर तरुणाई फिरकणारा असून निशा कुसेकर ही प्रसिद्ध सूत्रसंचालिका या महोत्सवाचे सूत्रसंचलन करणार आहे. तर या दहीहंडी उत्सवाचे इव्हेंट बीड येथील सुप्रसिद्ध ड्रीमलँड चे रविराज जेधे हे करणार आहेत. दहीहंडी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून आष्टी शहरात होणाऱ्या या दहीहंडी महोत्सवास आष्टी तसेच तालुक्यातील नागरीकांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन युवानेते जयदत्त धस यांनी केले आहे.






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.