सणासुदीच्या काळात कायद्याचे पालन करा धार्मिक भावना दुखावू नका - पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ

 सणासुदीच्या काळात कायद्याचे पालन करा धार्मिक भावना दुखावू नका - पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ 



आष्टी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न


आष्टी (प्रतिनिधी)- गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर आष्टी येथे पोलीस ठण्यामध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. सणासुदीच्या काळामध्ये कुणाच्याही भावना दुखावू नयेत व सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे म्हणजे सर्वत्र शांतता राहील असे प्रतिपादन बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश  बारगळ यांनी आष्टी येथे केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक सतीश पांडकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवडे, नगराध्यक्ष जिया बेग उपस्थित होते. 

यावेळी बोलताना मुफ्ती शेख शफी मुफ्ती चिखलीवाले यांनी संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील दाखले देऊन सामाजिक शांतता राखण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार ॲड.सीताराम पोकळे यावेळी म्हणाले की, बेलगावच्या रेणुकाई गणेश मंडळातर्फे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, तसेच समाजप्रबोधन पर व्याख्यान इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात येणार आहेत. या सणासुदीच्या काळात नागरिकांनी आपापल्या धर्माचे आचरण करून शांतता राखावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ॲड. राकेश हंबर्डे व इतरांची यावेळी समायोजित भाषणे झाली. आष्टीचे माजी नगरसेवक सादिक भाई कुरेशी, शिवसेनेचे नेते जालिंदर वांढरे, युवा नेते अशोक अण्णा पोकळे, पोलीस मित्र संघटनेचे ज्ञानेश्वर पोकळे, सरपंच पंडित पोकळे, अध्यक्ष शहाजी पोकळे सर, दीपक पोकळे सर, शेंबडे चेअरमन, सदा दिंडे, पत्रकार अविशांत कुमकर, अविनाश कदम, समीर शेख, संतोष नागरगोजे व गावोगावचे गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत देवा जोशी यांनी केले.

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे, नामदेव धनवडे पोलीस हवालदार काळे बबुशा ,अशोक शिंदे, सचिन पवार ,अशोक तांबे, वाणी ,क्षीरसागर, मुंढे ,जाधव, काकडे ,शेख सद्दाम इत्यादी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.