सरस्वती माध्यमिक विद्यालय , सिंधूनगर,पुणे ४४ या शाळेत मुलींच्या आरोग्यविषयक "उमलत्या कळ्यांचे आरोग्य" या विषयावरील व्याख्यान

 सरस्वती माध्यमिक विद्यालय , सिंधूनगर,पुणे ४४ या शाळेत मुलींच्या आरोग्यविषयक "उमलत्या कळ्यांचे आरोग्य" या विषयावरील व्याख्यान 





    दिनांक २४/०७/२०२४ वार:- बुधवार निगडी प्राधिकरण,सिंधुनगर ,पुणे ४४ येथील सरस्वती माध्यमिक व रोटरी क्लब ऑफ पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ६ वी,७ वी च्या मुलींसाठी आरोग्यविषयक व्याख्यान नवनगर शिक्षण मंडळाचे व्यवस्थापक मा. सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साही वातावरणात पार पडले.

या कार्यक्रमाला विद्यालयाच्या  प्राचार्या मा.सौ.सुरेखा वाळुंज,रोटरी क्लब ऑफ पिंपरी चिंचवड चे प्रेसिडेंट मा.श्री.गौतम शहा,श्री.अशोक मेहेर, सौ.आनंदिता मुखर्जी,सौ.साधना दातीर,विभाग प्रमुख सौ. गुरव मॅडम व स्त्रीशिक्षिका उपस्थित होत्या.



      डॉक्टर दिपाली पाटेकर यांनी  इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींसाठी वैयक्तिक स्वच्छता कशी असावी,आहार कोणता घ्यावा, याविषयी सविस्तर माहिती दिली. निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असते या सुविचाराप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य स्वस्थ आहे ते सर्व ठिकाणी आघाडीवर नेहमीच असलेले आम्हाला पाहावयास मिळते हे त्यांनी सांगितले.चांगल्या आरोग्यासाठी सात तास पुरेशी झोप असावी.दैनंदिन जीवन जगत असताना कोणकोणत्या सवयींचे पालन केल्याने आरोग्य चांगले राहते त्याच्याविषयी मार्गदर्शन केले.

         या व्याख्यानाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ.सविता पाटील,रांगोळी ,प्रतिमा पुजन,फोटो ग्राफी सौ.प्रतिमा काळे,चहा नाष्टा सौ.कल्पना उभे यांनी केले तर आभार सौ.रेश्मा बनसोडे यांनी मानून कार्यक्रमाची सांगता झाली.सर्व स्त्री शिक्षिकांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.