आष्टीच्या एमआयडीसीची निविदा निघाली सुरेश धस यांच्या पाठपुराला यश
आष्टी (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आष्टी फेज 2 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सर्वेक्षणाची निविदा निघाली असून माजी मंत्री सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.त्यामुळे आष्टीच्या एमआयडीसीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
याबाबत सहा महिन्यापूर्वी आष्टी फेज 2 साठी मंजुरी मिळावी या साठी सुरेश धस यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ श्रीमती मुळे व प्रादेशिक अधिकारी औरंगाबाद विभागाचे चेतन गिरासे यांनी आष्टी शहरानजिक जागेची पाहणी केली. आणि सदरील 50 हेक्टर जागा एमआयडीसी साठी योग्य असल्याचे सांगत सदर प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. गुरुवार दि 25 जुलै रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या उच्चाधिकार समितीने या प्रस्तावास मान्यता दिली असून लवकरच सर्व सुविधांनी युक्त असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आष्टी फेज 2 (एमआयडीसी) कार्यान्वित होणार असून फेज 1 मधील एमआयडीसी मधील रस्ते,पाणी,तसेच सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे आष्टी तालुका वासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.तालुक्यातील नवउद्योजकांना या एमआयडीसी मध्ये जागा उपलब्ध होणार आहे.व या माध्यमातून युवकांना रोजगार मिळन्यास वाव मिळणार आहे.तसेच तालुक्याच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे.या निर्णयाचे सुरेश धस यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे जाहीर आभार मानले आहेत.


stay connected