लाडकी बहीण योजनेचा वटणवाडी गावात कॅम्प घेऊन किरण शिनगीरे यांनी मोफत फॉर्म भरून दिले
****************************
51 महिलांचे मोफत ऑनलाईन फॉर्म भरून दिले
*****************************
*****************************
आष्टी प्रतिनिधी- आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते किरण भगवानराव शिनगीरे यांनी वटनवाडी गावामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कॅम्प घेऊन 51 महिलांचा मोफत ऑनलाईन फॉर्म भरून दिला.
महायुती सरकारने अर्थसंकल्पात सादर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत सरकार पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य करणार आहे.
तालुक्यातील वटनवाडी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते किरण भगवानराव शिनगीरे यांच्या संकल्पनेतून दिनांक 17/07 2024 रोजी वटनवाडी गावांमध्ये कॅम्प घेऊन 51 महिलांचा त्यांनी मोफत ऑनलाईन फॉर्म भरून दिला आहे. तसेच महिलांना कोणताही त्रास होणार नाही, वेळ ही वाचेल सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे गावांमध्ये शेतकामे सुरू आहेत. महिला शेतकरी कामात व्यस्त आहेत. त्यांना माहिती नसल्यामुळे शहरी ठिकाणी जाऊन आर्थिक भुर्दंड व वेळ वाचावा म्हणून किरण भगवानराव शिनगीरे यांनी गावातच कॅम्प घेऊन महिलांना या योजनेबाबत सविस्तर माहिती सांगून, तसेच त्यांचे ऑनलाइन फॉर्म ही भरून दिले. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच शिनगिरे यांना फॉर्म ऑनलाईन करण्यासाठी प्रभाताई वायकर, संतोष वायकर, प्रवीण शिनगिरे, एकनाथ गायकवाड यांचे सहकार्य लाभले.
किरण शिनगिरे यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.शिनगिरे यांचे महिलांनी गावात कॅम्प घेऊन मोफत ऑनलाईन फॉर्म भरून दिल्यामुळे मानले आभार..
*****************************


stay connected