भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा 




राज्यातील महसुल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या मान्य करणेबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवि काका ढोबळे यांनी महसूल मंत्र्याकडे मागणी केली आहे .महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबीत मागण्यासंदर्भात महसुल कर्मचाऱ्यांनी दि 15/07/2024 रोजी पासुन राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले असून, मागण्या मान्य करण्या बाबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने आष्टी तालुका अध्यक्ष यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे .



सदर मागण्या लवकरात लवकर मान्य करून त्यांच्या मागण्याचा सकारात्मक विचार करावा. अशी मागणी रवि (काका) ढोबळे पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आष्टी तालुका अध्यक्ष यांनी केली आहे .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.