सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे,३५ येथे उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी.
पुणे:- शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे,३५ येथे उत्साहात गुरूपौर्णिमा साजरी झाली.इयत्ता सहावीच्या वर्गाकडे या कार्यक्रमाचे नियोजन होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक माननीय श्री.गोविंद दाभाडे सर यांनी स्वीकारले,तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.संगीता गुरव मॅडम या होत्या.प्राचार्या सौ.वाळुंज मॅडम,उपप्राचार्य श्री.विजय बच्चे सर,पर्यवेक्षिका सौ.घावटे मॅडम व सौ.गुरव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक घुले यांने तर निवेदन माहिराज शेवाळे व शितल पंचांगे यांनी केले.शिवम कांबळे,जान्हवी बाजगिरे,आराध्या पवार,समृध्दी देवकर,वैभव नेटके, साक्षी अनकलगी,धनश्री शिंदे,शुभ्रा भिसे,श्लोक गिरबोने,शर्वरी जाधव,श्रद्धा उघडे यांनी भाषणे केली. तर ६ वी ब मधील पुजा मदार हिने आईची महिमा वर आधारित सुंदर अशी कविता सादर केली.तर शाळेतील शिक्षिका सौ.भालेराव मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले तर सौ.गुरव मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार ६ वी अ मधील कुमारी दिपल पाटील हिने मानले अन् कार्यक्रमाची सांगता झाली.जयंती निमित्ताने ६ वी अ व ब वर्गात चित्रकला स्पर्धा सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी आयोजित केली होती.यात १५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला.१)जान्हवी बाजगिरे:-प्रथम क्रमांक,२)राजरत्न कांबळे :-द्वितीय क्रमांक,३)मीरा मगर :-तृतीय क्रमांक,४)शिवम कांबळे :- उत्तेजनार्थ १ क्रमांक,५) दिपल पाटील:- उत्तेजनार्थ क्रमांक २ तसेच ६)संस्कार मेनकर :-सहभाग,७) जैनब गुडाळी:-सहभाग,८) कुमोद माने:-सहभाग,९) मधूकुमारी निर्मलकर :-सहभाग,१०)संस्कृती भूरुक :-सहभाग,११)धनश्री पाचारे:- सहभाग,१२)श्रेयस तांबे :- सहभाग,१३) साई माळे:- सहभाग,१४)अभिराज गवारे:- सहभाग,१५)आराध्या पवार:- सहभाग घेतला.सर्व विजयी विद्यार्थ्यांचे संस्थापक,प्राचार्या,उप प्राचार्य,पर्यवेक्षिका,पालक व वर्गशिक्षिका सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या व भरभरून कौतुक केले.तसेच गुरूपौर्णिमा निमित्त...१)जान्हवी बाजगीरे,२)मीरा मगर,३)जैनब गुडाळी,४)राजरत्न कांबळे,५)कुमोद माने यांनी सुंदर असे भेटकार्ड ही बनवले.




stay connected