कांद्याच्या बाजारामुळे कडा बाजार समितीचा नावलौकिक - मा.आ.धोंडे

 कांद्याच्या बाजारामुळे कडा बाजार समितीचा नावलौकिक - मा.आ.धोंडे

--------------------

कड्यात जनसंपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद



--------------------

राजेंद्र जैन/ कडा 

-------------------

येथील कांद्याच्या बाजारपेठेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा बीडसह इतर जिल्ह्यात देखील नावलौकिक झाला. हीच बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असली तरी संचालकांनी 

बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देताना त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भीमराव धोंडे यांनी केले. कडा शहरात धोंडे यांच्या जनसंपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, धोंडेंनी भेटी दरम्यान कडेकरांच्या समस्या जाणून घेतल्या.


कडा शहरात माआ धोंडे यांनी जनसंपर्क अभियांतर्गत कडा कृषी बाजार समितीला भेट दिली. बाजार समिती सभापती रमजान तांबोळी, उपसभापती नामदेव धोंडे व संचालकांनी भीमराव धोंडे व युवानेते अजय धोंडे यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी माजी सभापती संजय ढोबळे, संचालक रामभाऊ मधूरकर, योगेश भंडारी, संजय मेहेर, अनिल ढोबळे, संदीप नागरगोजे,  अण्णासाहेब लांबडे आदी मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना धोंडे म्हणाले की, बाजारपेठेच्या दृष्टीकोनातून या शहराकडे पाहिले तर कडा तालुक्याचा केंद्रबिंदू ठरले आहे,

मात्र शहराचा पाणीप्रश्न अजूनही सुटलेला नाही, बसस्थानकाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आपण आमदार असताना रुरबन योजनेच्या माध्यमातून कड्यासाठी आठ कोटीचा निधी दिला होता. तालुक्यात उत्पादीत झालेला शेतकऱ्यांचा माल बाहेर जाता कामा नये. यासाठी बाजार समितीनच्या संचालक मंडळानी एकत्रित प्रयत्न करावेत. तसेच शेतकरी वर्ग हा सध्या शेतीला जोडधंदा म्हणून शेळी,बोकड पालन करण्याकडे वळला आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा. म्हणून बाजार समितीने शेळी, बोकड वजनावर विक्री सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. येथील दुध संघासह बाजार समिती या दोन्ही संस्था आपण विधानसभा सदस्य असताना सुरू केल्या असल्याचे सांगू‌न येथील कांदा बाजारामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा बीडसह शेजारी जिल्ह्यात ही नावलौकिक झाला असल्याचे गौरवोदगार धोंडे काढले. तालुक्यात उत्पादीत झालेला शेतकऱ्यांचा माल बाहेर जाता कामा नये. यासाठी बाजार समितीने प्रयत्न करावेत. जनसंपर्क अभियाना अंतर्गत कडा शहरात, वाड्या वस्त्यावर व बाजारपेठेत फिरून लोकांच्या भेटी घेऊन व वृद्धांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लाडकी बहीण, भाऊ या योजनेचा लाभार्थींनी लाभ घेण्याचे आवाहन धोंडेंनी केले. जनसंपर्क अभियान दौऱ्याच्या निमित्ताने धोंडेंचे ठिकठिकाणी वाजतगाजत फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत  करण्यात आले.

-----%%------




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.