आष्टीत बंद घरात तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

 आष्टीत बंद घरात तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ 



आष्टी प्रतिनिधी


आष्टी शहरातील माळी गल्ली येथे राहणाऱ्या तरूणाचा राहत्या घरात मयतस्थितीत कुजेलला मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी दुपारनंतर आढळून आला आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.खंडु सदाशिव भोपळे वय-२९ रा.माळेगल्ली असे मयत तरूणाचे नाव आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, खंडु सदाशिव भोपळे हा तरूण माळेगल्ली आष्टी येथे  एकटाच वास्तव्याला होता.तो हाॅटेल व्यावसायिक होता.दरम्यान मंगळवारी २५ जून रोजी दुपारी ३ वाजता शेजारी राहणाऱ्यांना घरातून वास येत असल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी घर उघडून पाहिले असता मृतदेह आढळून आला हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीसांना माहिती देण्यात आली. घराचा दरवाजा उघडताच त्याचा मयतस्थितीत मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे समोर आलेले नाही. याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक नरवाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हिंगे, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे,पो.ना.बांगर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोना बांगर हे करत आहेत.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.