आष्टी मतदार संघासाठी आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाचा 16 कोटी रुपये निधी मंजूर आ.सुरेश धस यांची माहिती.

 आष्टी मतदार संघासाठी आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाचा 16 कोटी रुपये निधी मंजूर आ.सुरेश धस यांची माहिती.



आष्टी (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघांमधील शहरालगत वाहणाऱ्या प्रमुख नद्या त्याचबरोबर छोट्या खेडेगावातून वाहणाऱ्या मोठ्या नद्या यामुळे  नदीपात्रालगत शहराची मुख्य बाजारपेठ त्याचबरोबर मंदिर परिसर तसेच स्थानिक रहिवासी आपत्कालीन परिस्थितीमध्ये नदीच्या वाढत्या पाण्यामुळे पुराचा मोठ्या प्रमाणावर होणारा धोका लक्षात घेता यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून आष्टी मतदारसंघासाठी संरक्षण भिंत उभारणे यासाठी महाराष्ट्र शासनाने 16 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे असल्याची माहिती आ.सुरेश धस यांनी दिली आहे.

या मध्ये आष्टी शहरातून वाहणाऱ्या तलवार नदीच्या पात्रास दुतर्फा संरक्षण भिंत बांधकाम करणे ५ कोटी रु. मौजे वाळुंज ता.आष्टी येथे तलवार नदीलगत भैरवनाथ मंदीर परिसरास संरक्षण भिंत बांधकाम करणे ३ कोटी रु.पाटोदा शहरातूर जाणाऱ्या मांजरा नदीच्या पात्रास दुतर्फा संरक्षण भिंत बांधकाम करणे ५ कोटी रु.तर मौजे अमळनेर ता.पाटोदा येथे गावलगत जाणाऱ्या लेंडी नदीच्या पात्रास बाजारतळ परिसरास संरक्षण भिंत बांधकाम करणे ३ कोटी रु.असे एकूण 16 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती आ.सुरेश धस यांनी दिली.यावेळी आ.धस यांनी आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र शासन,बीड जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड व बीड पाटबंधारे विभागाचे विशेष आभार मानले आहेत.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.