प्रदेशध्यक्ष जंयत पाटील यांच्याहस्ते आष्टी येथील डॉ. नदीम शेख यांची बीड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड
लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात यश संपादन केल्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व विभागातील पदनियुक्त्या जाहिर केल्या आहेत . नुकतीच संभाजीनगर येथील मेळाव्यात प्रदेशध्यक्ष जंयत पाटील यांच्याहस्ते आष्टी येथील डॉ. नदीम शेख यांची बीड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आष्टी शहरातील सतत समाज कार्यात अग्रेसर असलेले डॉ. नदिम शेख यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरद पवार गट) ने दखल घेत त्यांची बीड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांना निवडीचे नियुक्ती पञ प्रदेशध्यक्ष जंयत पाटील, युवक प्रदेशध्यक्ष महेबुब शेख यांच्या उपस्थितीत छञपती संभाजी नगर येथील कार्यक्रमात देण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आपल्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी चोखपणे बजावून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व शरद पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करणार असून अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नदिम शेख यांनी तेजवार्ता ला सांगीतले.
stay connected