बंगळुरू बॉम्बस्फोटात हात; भाजपच्या कार्यकर्त्याला अटक

 *तपासात धक्कादायक माहिती उघड*

 बंगळुरू बॉम्बस्फोटात हात; भाजपच्या कार्यकर्त्याला अटक



बंगळुरू, दि. ५ (वृत्तसंस्था) - कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोट प्रकरणाचे धागेदोरे उलगडले असून, धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी साई प्रसाद हा भाजपचा कार्यकर्ता असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याला अटक केली आहे. बंगळुरूच्या व्हाइटफिल्ड परिसरातील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेत १ मार्चला दुपारी १२.५० च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. हा आईडी स्फोट होता. या स्फोटात १० जण जखमी झाले. 'एनआयए'ने तपास हाती घेतला. सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या दहशतवादी संघटनेशी संबंधित मुझाविर हुसेन शाझीब आणि अब्दुल मतीन ताहा या दोघांना शिवमोगा जिल्ह्यातील तिथहिल्ली गावातून अटक केली. त्यानंतर चिकमंगळूरू जिल्ह्यातून मुझामिल शारिफला अटक केली. 'एनआयए'ने आणखी आरोपींच्या शोधासाठी कर्नाटक, तामीळनाडू आणि उत्तर प्रदेशातील १८ ठिकाणी छापे टाकले. प्रत्येकी फरारी आरोपांच्या शोधासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यात आणखी धक्कादायक माहिती उघड झाली असून, साई प्रसाद या भाजप कार्यकर्त्याला अटक केली आहे. साई प्रसादच्या स्फोटाशी संबंधित आरोपींशी काय संबंध आहे? स्फोटके त्याने ठेवली होती का ? याची चौकशी एनआयएकडून सुरू आहे.

 *प्रत्येक वेळी टेरर कनेक्शन भाजपचंच का? काँग्रेसचा सवाल*

बंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणी संशयित म्हणून भाजपच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे. नेहमी भाजपचेच टेरर कनेक्शन का निघतं, असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ही बातमी टीव्ही चॅनेल दाखवणार नाहीत आणि ते का हे सगळ्यांनाच माहीत आहे, असा निशाणाही काँग्रेसने साधला.

 *रवा इडली खाल्ली आणि स्फोटकांची बॅग ठेवून गेला* 

कॅफेत आला तेव्हा आरोपीने चष्मा घातला होता. डोक्यावर टोपी होती. त्याने रवा इडली खाल्ली आणि हातातील स्फोटकांनी भरलेली बॅग कॅफेत ठेवून गेल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.