आम्ही कधीच जातीपातीचे राजकारण करीत नाही : Bajarang Bappa Sonavane
केज/प्रतिनिधी ( विश्वास राऊत )
आम्ही कधीच जातीपातीचे राजकारण करीत नसून भाजप जाणीवपूर्वक जातीपातीचे राजकारण करीत आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला आणि जिल्ह्यात पंधरा वर्षा पासून एकच घरातील खासदार असताना अद्याप रेल्वेचे काम पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आणखी जिल्हा वासीयांना आणखी किती पिढ्या रेल्वेची वाट पाहावी लागणार ? असा घणाघात त्यांनी पवनसुत या त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी वार्तालाप करताना केला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी ६ एप्रिल २०२४ रोजी त्यांच्या पवनसुत या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार आणि महाविकास आघाडी यांच्या नेत्यांनी त्यांना बीड लोकसभेचे तिकीट बजरंग सोनवणे यांना मिळाल्या निमित्त केज तालुक्यातील पत्रकारां सोबत वार्तालाप करीत होते. त्यांनी २०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक त्यांना ५ लाख ९ हजार १०८ मतदारांनी विश्वास टाकून त्यांना मतदान केले. हा त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान असून राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार आणि मित्र पक्षांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करीत त्यांना लोकसभेचे उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच विरोधी पक्षाच्या उमेदवारावर टीका करताना ते म्हणाले की, मागील तीन पंचवार्षिक पासून एकाच घराण्यातील खासदार आहे. परंतु ते आता पर्यंत जिल्ह्यात एकही प्रकल्प आणू शकलेली नाहीत. जन्मा पासून रेल्वेचे नुसती चर्चा आहे मात्र रेल्वेच्या कामाला गती मिळाली नाही. आता पर्यंत अहमदनगर ते कडा एवढाच मार्ग पूर्ण झालेला आहे. रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी नगर ते बीड मार्ग परळी पर्यंत रेल्वे मार्ग प्रतीक्षात पूर्ण होऊन रेल्वे धावायला आणखी किती पिढ्या जाव्या लागतील ? असाही सवाल त्यांनी केला तसेच रेल्वे बाबत बोलत ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख व शरदचंद्रजी पवार यांच्यामुळेच राज्य शासन आणि केंद्र यांनी या रेल्वे मार्गाचा ५० टक्के वाटा उचलण्याला संमती दिली केंद्रात एकच आमचे सरकार असता देखील अद्याप पर्यंत या मार्गाला निधी का दिला नाही ? आणि मंजूर का करून घेतला नाही ? तसेच या रेल्वे मार्गाचा केजवासियांना काही फायदा नाही. हा रेल्वे मार्ग केज आणि धारूर जवळून गेला असता तर निश्चित फायद्यात राहिला असता. मात्र सत्ताधाऱ्यांनी याचा विचार केलेला नाही. केज विधानसभा मतदार संघ हा राखीव असल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कायम अन्याय केलेला आहे. जातीपातीचे राजकारण आम्ही कधीही करत नसून भाजपाच्या उमेदवार मात्र कायम जातीपातींचा आधार घेऊन जातीचे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी जिल्ह्यात आता पर्यंत एकही नवीन औद्योगिक वसाहत एखादा साखर कारखाना किंवा एखादा प्रकल्प आणलेला आहे का ? याचे देखील त्यांनी आत्मपरीक्षण करावे. असे म्हणाले. या पत्रकार परिषदेला खरेदी विक्री संघाचे चेअरमन बालासाहेब बोराडे, शेकापचे भाई मोहन गुंड आणि प्रा हनुमंत भोसले उपस्थित होते.
पुढे बोलताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की, मी जिल्ह्याचा खासदार झाल्या नंतर विकासा पासून जाणीव पूर्वक दूर ठेवलेली शहरे, गावे, वाड्या वस्त्या व तांडे व त्या केंद्राच्या निधीतून विकास करेल तसेच प्रत्येक गावात पंतप्रधान ग्रामसडक योजनेद्वारे रस्ते करीन आणि माझा असा माणस आहे की, जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर दरडोई उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी बेकारी कमी व्हावी म्हणून जिल्ह्यात रोजगाराचे प्रकल्प राबविणे आणि उदद्योग व्यवसायाला चालना देणे. याला प्राधान्य देणार असल्याचे विश्वास त्यांनी व्यक्त केला.
stay connected