कानडीबदन ग्रामस्थांनी घेतली तुतारीला मतदान करण्याची शपथ,केज तालुक्यात Bajarang Bappa Sonavane यांचा झंजावाती दौरा
केज/प्रतिनिधी - विशवास राऊत
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील अनेक गावांना जात गाठीभेटी घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.यादरम्यान ठिक ठिकाणी महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले तर कानडीबदन ग्रामस्थांनी तुतारीलाच मतदान करण्याची शपथ घेत बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा उघडपणे व्यक्त केला आहे.शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी जाहीर झाल्या नंतर आपल्यागाठीभेटीचा कार्यक्रम आता झपाट्याने वाढवत एकाच दिवसात अनेक गावांना गाठीभेटी द्वारे आपली भूमिकाविषद करण्यावर भर दिला आहे याच क्रमात त्यांनी नुकताच दिपेवडगाव, पळसखेडा,कानडी बदन, कौडगाव,बनसारोळा, इस्थळ,सौंदना,नायगाव, धनेगाव,धनेगाव कॅम्प येथे भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांच्या सोबत माजी पंचायत समिती सदस्य बंडू चौधरी,भुसारी आप्पा, डॉ.उत्तम खोडसे हे होते.
या प्रसंगी त्यांनी उपस्थितां शी संवाद साधताना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. बजरंग सोनवणे यांचे गावागावात मोठ्या प्रमाणात ढोलताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.अनेक ठिकाणी सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले.याप्रसंगी दीपेवडगाव चे सरपंच दिपगुळभिले, सुग्रीव गुळभिले,गोविंद चव्हाण,बापूराव गुळभिले, सर्जेराव तपसे तसेच पळसखेडा येथे गावचे सरपंच वसंत चव्हाण, यशवंत चव्हाण,श्रीमंत चव्हाण,गोविंद चव्हाण, युवराज चव्हाण,कृष्णा धन्वे,श्रीहरी चव्हाण,महेश गायकवाड,प्रकाशचव्हाण, कैलास चव्हाण,रंगनाथ गायकवाड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.कौडगाव आणि कानडीबदन येथे भेट दिली.सरपंच दिगंबर पांचाळ,उपसरपंच राजाभाऊ जगदाळे,माजी सरपंच उद्धव बप्पा दळवे, आण्णा साखरे,लक्ष्मण साखरे,सुधाकर दळवे, योगीराज साखरे,सौ. ज्योती साखरे आणि महिला व पुरुष यांची हजेरी होती.तसेच कौडगावचे सरपंच नारायण महाकुंडे,उप सरपंच बळीराम चाटे, शरद बापू पवार,रंजीत पवार,माजी सरपंच रामचंद्र पवार,रवी चाटे, प्रशांत पवार,सर्जेराव पवार,ग्रामपंचायत सदस्य पवार यांची उपस्थिती होती.तर बनसारोळा, इस्थळ गावाला काल भेट दिली.या भेटीमध्ये गावातील नागरीकांशी आपुलकीने संवाद साधला.यावेळी रुपेश बोरगावकर,सुधीररानमारे, अरुण राऊत यांच्यासह माजी सभापती युवराज दादा गोरे,सरपंच जयचंद धायगुडे,कृष्णा गोरमाळे, बबन रोकडे,विठ्ठल कावळे,अनिकेत गोरे, दिलीप गोरे,बाळासाहेब धायगुडे तसेच इस्थळ गावामध्ये रमेशराव यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.धनेगाव येथेही प्रचंड उत्साहात स्वागतकरण्यात आले यावेळी माजीसरपंच सुहास गुजर,उपसरपंच किशोर सोनवणे यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती तर नायगाव येथे सरपंच विवेक खोडसे,चेअरमन रामकीसन खोडसे,लक्ष्मण खोडसे,सर्जेराव खोडसे, शशिकांत खोडसे,राहुल खोडसे,डाॕ.उत्तम खोडसे आदींची उपस्थिती होती
गावकऱ्यांनी घेतली तुतारी ला मतदान करण्याची शपथ
देवा शपथ खरं बोलेन खोटे बोलणार नाही अशी शपथ न्यायालयात घेतली जाते मात्र लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झालेली असताना केज तालुक्यातील एका गावात गावकऱ्यांनी चक्क तुतारीला मतदान करण्याची शपथ घेतली आहे.गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या आई- वडिलांना साक्ष ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाला आणि त्यांचे बीड लोकसभेचे उमेदवार यांना मतदान करण्याची शपथ घेतली आहे.या वेळी गावकऱ्यांनी घेतलेली शपथ अशी आहे की, आम्ही इमानदारीने अशी शपथ घेतो की,येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शरदचंद्रजी पवार यांच्या तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून आई- वडिलांच्या इमानदारीने त्यांना मतदान करू.नंतर निवडून आल्यास त्यांच्या हाताला धरून कामकरून घेऊ.अशी निष्ठापूर्वक शपथ घेतल्याने केज तालुक्यातील कानडीबदन हे गाव चर्चेत आले आहे.
stay connected