हरी नारायण आष्टा येथे बजरंग सोनवणेंचीकाढली सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक,तालुक्यातील विविध गावात कॉर्नर बैठका घेत साधला संवाद
बीड/प्रतिनिधी
विश्वास राऊत
आष्टी तालुक्यातील हरी नारायण आष्टा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व इंडिया आघाडीचे उमेदवारबजरंग सोनवणे हे गाठीभेटीसाठी गेले असता गावकऱ्यांनी सजविलेल्या बैलगाडीतून वाजत - गाजत गावातून मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत केले.बीड लोकसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस,इंडिया आघाडीचे उमेदवारबजरंग सोनवणे हे प्रचारनिमित्त शुक्रवारी आष्टी तालुक्यात दौऱ्यावर होते.यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर,किशोर हंबर्डे, विधानसभा प्रमुख रामभाऊ खाडे,परमेश्वर शेळके,आपचे डॉ.नाथ, काँग्रेसचे रविदादा ढोबळे, सचिन वारूळे यांचीप्रमुख उपस्थिती होती.आष्टी तालुक्यातील हरीनारायण आष्टा येथे बजरंगसोनवणे यांचे आगमन होताच गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांची सजवलेल्या बैलगाडीतून ढोलताशाच्या गजरात वाजत - गाजत व फटाक्यांची आतिषबाजी करीत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या महिलांनी त्यांचे औक्षण करूनत्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.
उमेदवार बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी सकाळ पासूनच तालुक्यातील चिंचपुर (रे),डोके वस्ती, मातोळी,आष्टा फाटा, जामगाव वस्ती,जामगाव, वाळूज टाकळसिंग, चिखली,वाकी,शिराळ, कानडी(बु),धीर्डी,निमगाव चोभा,काटवन वस्ती, रुईनालकोल,फत्तेवडगाव, पिंपरी (घु.) येथे भेटी देऊन मतदारांशी संवाद साधत कॉर्नर बैठका घेतल्या.
stay connected