*रोजगार हमी योजना ची कामे यंत्राने न करता जॉब कार्ड धारकाकडूनच करून घ्यावीत-डॉ.वंजारे
*आपापल्या गावामध्ये होणाऱ्या रोजगार हमी योजनेची कामे जेसीबी ट्रॅक्टर किंवा इतर यंत्राने कोणी करत असेल तर तात्काळ आडवा, ती कामे रोजगार मिळवून देण्यासाठी आहेत ना की कॉन्ट्रॅक्टर, सरपंच,ग्रामसेवक पोसण्यासाठी त्यामुळे असे रोजगार हमीची कामे कोणी यंत्राने करत असेल तर तत्काळ व्हिडिओ,फोटो आणि तत्सम पुरावे माझ्याकडे पाठवा किंवा संबंधित तहसीलदार प्रांत अधिकारी किंवा पोलीस स्टेशन ला द्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर, सरपंच, ग्रामसेवक यावर तत्काळ कार्यवाही करा.अश्या कामात कोणी राजकीय किंवा कुठलाही दबाव आणत असेल तर सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे यांना ९३५८४२०९०९ या मोबाईल नंबर वर माहिती द्या. आपल्या घराच्या अशिशिक्षित बेरोजगार कष्टकरी शेतकरी मायबाप लोकांचे जॉब कार्ड घेऊन गावाचा रोजगार सेवक,सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमत करून तुमचे हक्काचे पैसे लुटत असेल तर पक्षाचा गोबर भक्त होऊन कोणतातरी पक्षाचा झेंडा हातात घेण्याऐवजी माय बापाला या लुटी पासून थांबवा काही मदत लागल्यास मला कळवा.रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविली गेली पाहिजे त्याचा गावकऱ्यांना फायदा झाला पाहिजे.ही जबाबदारी विशेष करून सुशिक्षित तरुणांना मी देतो आहे खालापूरी गावात अनेक कामे रोजगार हमी योजनेतून होत आहेत वेळोवेळी समोर उभे राहून त्यावर वाच ठेवा गुणवत्ता बघा काही अडचण आल्यास मी स्वतः तिथे थांबतो पण कामे दर्जेदार झाली पाहिजेत*
stay connected