शरद पवार गटाचे बजरंग सोनवने बीड लोकसभेच्या निवडणुक रिंगणात
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बीडसाठी बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरले आहे .
बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता संपली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बीडसाठी बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरविले आहे. शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाकडून बीड लोकसभेसाठी अनेक जण इच्छूक होते. त्यातच काही दिवसांपूर्वी अजित पवार गटातून शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेले बजरंग सोनवणे उमेदवारीचे कडवे दावेदार होते. मात्र त्यांच्यासोबतच ज्योती मेटे यांचे नाव देखील चर्चेत आल्याने काहिसा संभ्रम होता. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवारांनी अखेर बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत होणार आहे.
stay connected