आष्टीतील १५ मुली, ५ मुले एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण
वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या असणाऱ्या एमबीबीएस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. आष्टी तालुक्यातील वीस जणांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केली. यात मुलींची संख्या तब्बल पंधरा एवढी आहे.
एमबीबीएस परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिकणारे आष्टी तालुक्यातील वीस जण उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय म्हणजे मुलांच्या तिप्पट आहे. आष्टी तालुक्यात प्रथमच पंधरा मुलींनी एकाच वेळी एमबीबीएस परीक्षेत यश मिळवले. ग्रामीण भागात राहून माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेऊन नंतर नीट मधून वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस महाविद्यालयात या विद्यार्थ्यांनी जिद्द मेहनत व आत्मविश्वासाच्या जीवावर प्रवेश मिळवला होता. सन २०१९ मध्ये झालेल्या नीट परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांनी यश मिळवले होते. त्यांनी महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये साडेचार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून मानाची अशी एमबीबीएस ही पदवी मिळवली आहे. डॉ. शिवानी बोडखे, डॉ. स्वराली माळशिखरे, डॉ. अस्मिता घुमरे, डॉ. संपदा मोहन जगताप, डॉ. ऋतुजा आमटे, डॉ. कल्याणी औटे, डॉ. तेजश्री एकशिंगे, डॉ. ऋतुजा खाडे, डॉ. समीक्षा उढाणे, डॉ. प्रतीक्षा साखरे, डॉ. प्राजक्ता जगताप, डॉ. स्नेहा मुरटेकर, डॉ. सायली जगताप, डॉ. वैष्णवी सोनवणे, डॉ. अक्षता हंबर्डे, डॉ. विवेक पोकळे, डॉ. विक्रांत विधाते, डॉ. ओंकार गव्हाणे, डॉ. ऋषिकेश तरटे, डॉ . अभिजित खेडकर यांनी यश मिळवले
stay connected