राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. माधव साके यांची निवड

 राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी
प्रा. माधव साके यांची निवड

----------

Madhav sake


आष्टी, दि. 10 (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) बीड जिल्हा उपाध्यक्षपदी तालु्क्यातील कानडी खुर्द- मेहकरी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. माधव साके यांची मंगळवारी (दि. 9) निवड करण्यात आली. निवडीचे पत्र प्रा. साके यांना देण्यात आले आहे.

प्रा. माधव साके यांनी तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठविला आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक गरजू व्यक्तींना मदत केली असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. 

प्रा. साके यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी प्रा. माधव साके यांना निवडीचे पत्र दिले. या वेळी लोकसभेचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे, माजी आमदार बदामराव पंडित, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी आमदार साहेबरावजी दरेकर (नाना), आष्टी विधानसभा प्रमुख राम खाडे, आष्टी तालुकाध्यक्ष परमेश्वरकाका शेळके, पाटोदा तालुकाध्यक्ष शिवभूषणदादा जाधव, शिरूर कासारचे तालुकाध्यक्ष ------ आदी उपस्थित होते.

प्रा. साके यांच्या निवडीबद्दल मुख्याध्यापक दिलीप भवर, आबासाहेब गि-हे, ईश्वर साके, हौसराव जगताप, गणेश जगताप, शौकत पठाण, श्रीकांत नवसुपे, संतोष वाडेकर, सचिन काकडे, महादेव भालेराव, रवी वायकर, बाळू जगताप, रणजित पगारे, सचिन वाडेकर, पप्पू थोरवे, बापू खराडे, शशी खराडे, गोवर्धन ढगे आदींनी अभिनंदन करू पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.