Ramjan Mubarak : 9 वर्षीय जन्नत पानसारे हिने महिन्याभराचे रोजे केले पुर्ण

 Ramjan Mubarak : 9 वर्षीय जन्नत पानसारे हिने महिन्याभराचे रोजे  केले पुर्ण

---------------------------------------


Vdo news पहा👇📽️




आष्टी/प्रतिनिधी 

इस्लाम धर्मातील पवित्र असलेल्या रमजान महिन्याचा आरंभ मंगळवार दि.१२ मार्च पासून झाला आहे. या पवित्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी कडा येथील इयत्ता तिसरीत शिक्षण घेणारी नऊ वर्षीची जन्नत नासीर पानसारे या चिमुकल्या मुलीने रोजा पूर्ण केला. पहिला रोजा धरला त्यात तिला काही विशेष त्रास जाणवला नाही म्हणून त्यानंतर तिने नियमितपणे दररोज रोजा धरत या रमजान महिन्यातील आजचा शेवटचा रोजा पुर्ण करत आज या चिमुकल्या मुलीचे महिन्याभराचे रोजे पुर्ण केले आहेत. मागील पाच वर्षांपासून रमजान हा महिना उन्हाळ्यात येत आहे. यामध्ये रोजा पूर्ण करणे म्हणजे एक आश्चर्य समजले जाते. त्यात नवल म्हणजे या चिमुकल्या मुलीचे सर्वच रोजे पुर्ण झाले आहेत. यंदा उन्हाची दाहकता अधिक वाढलेली आहे. अशातच जन्नत नासीर पानसारे हिने महिन्याचे तीस रोजे काटेकोरपणे पुर्ण केले. जन्नत नासीर पानसारे हि  मा.ग्रा.पं.सदस्य स्व.बाबा पानसारे यांची नात असून नासीर पानसारे यांची मुलगी आहे. तर अंजुम उर्फ पिंटू पानसारे,मा.ग्रा.पं.सदस्य जावेद उर्फ बबलू पानसारे,वसिम पानसारे यांची पुतणी आहे. महिन्यातील संपूर्ण ३० रोजे पुर्ण केल्या बद्दल जन्नत नासीर पानसारे हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.