आष्टी येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिर तसेच सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न
आष्टी (प्रतिनिधी) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं प्रतिसाद मिळाला.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त आष्टी येथील अनिषा ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने व आष्टी तालुक्यातील क्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच रावण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.या शिबिराच्या उद्घाटक प्रसंगी पत्रकार तथा छायाचित्रकार सचिन रानडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस हे होते.यावेळी 110 रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग घेत रक्तदान केले.तर शहरातील संकल्प बुद्ध विहार येथे विद्यार्थ्यांची हस्ताक्षर सुंदर, सुबक व वळणदार बनविण्यासाठी रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने विध्यार्थी आणि नागरिकांसाठी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संकल्प बुद्ध विहार भीमनगर येथे संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी आष्टी व आष्टी परिसरातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रत्येक अक्षर सुंदर व वळणदार बनविण्यासाठी अनिलजी बेद्रे सर यांनी चांगल्या व सोप्या भाषेत विध्यार्थ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन केले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने अनिलजी बेद्रे सर यांचे अभिनंदन करून आभार मानले.यावेळी ऍड.वाल्मीक निकाळजे,अरुण भैया निकाळजे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार अविनाश कदम रुपेश निकाळजे,राजू निकाळजे,आष्टी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक दीपक निकाळजे,अशोक निकाळजे,सनी काल कुंड, पी.बी.बोडखे,ऋषी थोरात,राहुल निकाळजे,ऍड शंकर निकाळजे,विनोद निकाळजे,योगेश तूपेरे,युवराज निकाळजे,नेल्सन निकाळजे,कल्याण निकाळजे,रिक्षा युनियन अध्यक्ष किशोर निकाळजे,सुहास पगारे,सौरभ निकाळजे, वीरेंद्र निकाळजे, विजय शिंदे,गौरव निकाळजे,रोहित शिरोळे, ओम लष्कर, मोहित कांबळे, करण कांबळे, आदर्श सोनवणे, महेश पांडागळे, सुभाष निकाळजे, बुद्धभूषण पवार, सुरज पगारे,सागर निकाळजे,कुणाल निकाळजे,छगन पगारे,शाहू निकाळजे,श्रेयस निकाळजे आदी उपस्थित होते.
stay connected