*पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे यांचे पत्र*
प्रती,
मा.पंतप्रधान,
मा.नरेंद्र मोदी जी,
पंतप्रधान कार्यालय, साऊथ ब्लॉक, रायसीना हील,
नवी दिल्ली-११००११
महोदय पत्रास कारण की,आपले पत्र मिळाले वाचून आनंद झाला.माझ्या सारख्या सामान्य आणि सुजाण नागरिकास आपण पत्र लिहिले आणि आपण केलेल्या कामाची यादी दिली वाचून मन प्रसन्न झाले खूप चांगले काम आपण केलेली आहेत .पण अजूनही अपघाताने किंवा मुद्दामहून आपण किंवा आपल्या पक्षाकडून झालेल्या चुकीच्या कामाचे ही मूल्यांकन होणे गरजेचे आहे.तेही आपण मागचे आणि भावी पंतप्रधान म्हणून स्वतःच्या चुका पदरात घेऊन दुरुस्त कराल हीच अपेक्षा .
भारताचे पंतप्रधान सम्माननीय नरेंद्र भाई मोदीजी यांनी मला पाठवलेले हे पत्र वाचून आनंद झाला.पण यामध्ये शेतकऱ्यांची आय म्हणजे उत्पन्न दुप्पट करणार,पेट्रोल डिझेल महागाई कमी करणार,दहा लाख नोकऱ्या कुठे आहेत,मुंबई ची उद्योगधंदे गुजरातला का पळवले,कोणी भुखा प्यासा राहणार नाही,न खाणे दुंगा न खुद खाउंगा,मोदीजी की गॅरंटी, रोजगार, शिक्षण, महागाई,खाजगीकरण,भ्रष्टाचार बंद करणार नाही झाल्यास चौकात फाशी द्या,राजकारणातील वंशवाद ,घराणेशाही बंद करणार,सर्वधर्म समभाव, जवाणाची अग्णिविर भरती करून सहा वर्षासाठीच नियुक्ती ,एकाच धर्माचं बांधलेलं मंदिर, त्या मंदिर पूजेला आरएसएस चे प्रमुख मोहन भागवत यांना बोलावले पण महामहीम राष्ट्रपती यांना नाकारले कारण त्या आदिवासी आहेत.बाहेरच्या देशात गेल्यावर बुद्ध मूर्ती भेट देता किंवा घेता कारण भारत ही बुद्धभूमी आहे पण भारतात राम मंदिरासारखं भव्य दिव्य बुद्ध स्तूप,बुद्ध विहार,बुद्ध शाळा बांधणार आहात की नाही? हे सगळे प्रश्न मला पडले आणि त्यांनाही पत्र पाठवावं वाटले आहे .सध्या एलेक्ट्रोलर बॉण्ड मनी लोंड्रीनग् घोटाळा यावरही प्रश्न विचारावेसे वाटले आहेत.आणि मी नक्कीच विचारणार. निवडणुकीला व्यापाऱ्यांकडून पैसा घ्यायचा आणि त्यांना अभय द्यायचं हेच यांचं राजकारण ,निर्यात बंदी,स्वतःच्या पक्षात गुंड,अत्याचारी, आतंगवादी,भगवेधारी पोसायचे आणि बेटी बचाव बेटी पढाव नारा द्यायचा आणि त्यांच्या बलात्कार सर्रास करायचे,महिला खेळाडूंना ब्रजभूषण सारखा हैवान छळणार आणि तुम्ही मस्त गप्पा मारत राहणार बेटी बचाव बेटी पढाव वा भाई वा तुमचे मंत्री आवरा त्यांना शिस्त लावा,संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना कडक कार्यवाही करा,संविधान कायदा अबाधित ठेवून न्याय ,समता ,बंधुता, लोकशाही, सार्वभौम ठेऊन स्वातंत्र्य अबाधित ठेवा जातीयवाद धर्मवाद आणि प्रांतवाद सोडा त्याची शिस्त तुमच्या आमदार खासदार मंत्र्यांना लावा , प्रेस कॉन्फरनस घेऊन बोला ना बिनधास्त तुम्हाला रेडिओ वर बोलताना काय वाटत नाही मग पत्रकाराला भिता काय ? उलट देश चालवायला पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो मदतच करेल, हाथरस बलात्कार प्रकरणावर मोदी गप्प,जळत्या मणिपूर प्रकरणावर गप्प,महिला हल्ला अत्याचार आणि बलात्कार ,दलीत आदिवासी अत्याचार प्रकरणावर मोदी गप्प,पुलवामा सैनिक स्पोट प्रकरण, हाथरस आदिवासी घर आणि जंगल उध्वस्त प्रकरण,शेतकरी अडवणूक,त्यांना आंदोलनापासून दूर ठेवणं एक ना अनेक प्रकरण आहेत जे सन्माननिय मोदींना विचारायची आहेत .आणि तुम्हाला विचारायला सुरुवात केली की तुमचे गोबर भक्त यंत्रणा त्यांना कार्यवाही करते हे बंद करा .तुमची छबी आंतरराष्ट्रीय आहे तिला अबाधित ठेवा पण भारतात लोकांना खुश करा त्यांचे प्रश्न सत्य वचन देऊन सत्यात उतारा नाहीतर देश रसातळाला गेल्यास महापाप होऊन लोक चौकात फाशी देतील बिजेपी वाल्यांना ......!
तुम्हाला नवीन राजकीय वाटचालीस शुभेच्छा,ह्या चुका दुरुस्त कराल हीच अपेक्षा ....थांबतो
धन्यवाद , आपलाच
डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर,सामाजिक कार्यकर्ता,बीड,महाराष्ट्र,पिन कोड ४३११२२
संपर्क ९९२२५४१०३०


stay connected