DHULE | 400 प्लसचा नारा देणाऱ्या मोदींनी EVM शिवाय निवडणूक लढवून दाखवावी Abu Azmi यांचे आवाहन
धुळे : समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी हे संविधान बचाव रॅली घेऊन संपूर्ण राज्यभरात जात आहेत. ते आज धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मोदींच्या चारशे प्लसच्या नाऱ्या बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य जनतेतून निवडून येताना ईव्हीएम मशीन बाजूला करून दाखवावे, ईव्हीएम मशीन शिवाय 400 जागा निवडून दाखवण्याचे आवाहन आमदार अबू आजमी यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना आमदार अबू आझमी यांनी एमआयएम पक्षावर ही जोरदार टीका करत, सुरुवातीला हैदराबाद पुरता मर्यादित असणारा एमआयएम, आणि गुजरात पुरता असणारे नरेंद्र मोदी नंतर दोन्ही दिल्लीला गेले मुसलमानांची अवस्था खराब आहे, असे कारण एम.आय.एम पक्षाने सांगितले मात्र 2014 नंतर मुसलमानांची अवस्था सुधारली का? एम.आय.एम पक्ष काय करीत आहे? परिस्थितीत सुधारण्यासाठी आले होते ना तुम्ही मग आता काय झाले असा प्रश्न देखील अबू आजमी यांनी यावेळी उपस्थित करत एम.आय.एम पक्षावरही जोरदार टीका यावेळी त्यांनी केली.
देशातील संविधान वाचवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहू मात्र या देशातील मुस्लिमांचे नाव असणाऱ्या गावांची नावे बदलवली जात आहेत, यातील अनेक गावे मुगलांच्या काळात हिंदू धर्मावर आधारित होती मग ती का मुघलांनी बदलली नाही, फक्त मुसलमानांना टार्गेट करण्यात येते, महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांपैकी फक्त 3 जिल्ह्यांना मुस्लिम नाव होती आणि आता ती देखील बदलली गेली असून गावांची नावे बद्दलण्यामागे यांची द्वेषाची मानसिकता असल्याचा आरोप अबू आझमी यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, देशाची प्रॉपर्टी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, खासदार, आमदारांची कधीच नसते ती जनतेची असते आणि लोकप्रतिनिधी हे फक्त त्याची देखभाल करण्यासाठी असतात. मात्र दुसरीकडे प्रधानमंत्री हे देशाच्या अनेक कंपन्या विकण्यासाठी निघाले आहेत दरम्यान अनेक कंपन्यांची नावे घेतली आहे जी विकण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.


stay connected