सामाजिक कार्यकर्ते सावळेराम बळे बीड लोकसभा लढवणार
आष्टी/प्रतिनिधी
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकार योग्य निर्णय घेत नसल्यामुळे राज्यभरातील प्रत्येक गावातील मराठा बांधवांना लोकसभा निवडणूक लढवण्यास संदर्भात आव्हान केले त्याला प्रतिसाद देत बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते सावळाराम बळे हे बीड लोकसभा निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती सावळाराम बळे यांनी दिली आहे. असे उमेदवार प्रत्येक गावातून एक उभे राहणार आहेत असेही ते शेवटी बोलताना म्हणाले. मराठा समाजाने लोकशाही मार्गाने आंदोलने करुन आरक्षणाचा प्रश्न लावून धरला आहे. आता लोकसभेत प्रत्येक गावातून मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरुन सरकारची कोंडी करणार आहे. यामुळे आष्टी तालुक्यातूनही उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.


stay connected