अंमळनेर गटातील कोणत्याही व्यक्तीवर पुर्ण चौकशी केल्याशिवाय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करु नयेत.... सुरेश पाटील.
बीड (प्रतिनिधी)
अंमळनेर गटातील कोणत्याही व्यक्तीवर मग तो गरीब असो की श्रीमंत असो किंवा जाती-धर्माचा असो त्यांनी कोणते स्वरूपाचा गुन्हा केल्यास त्या गुन्ह्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता. गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्या व्यक्तीवर दाखल करू नये. असा आदेश शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा समाजसेवक सुरेश पाटील यांनी अंमळनेर पोलीस स्टेशनच्या प्रमुखांना दिला.
समाजसेवक सुरेश पाटील यांनी नुकतीच अंमळनेर पोलीस स्टेशनला धावती भेट देवून सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ यांची भेट घेतली. व त्यांच्याशी विविध विषयावर व परिस्थितीवर चर्चा केली. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात फक्त जातीदोषातून एखाद्या गरीब कुटुंबाच्या प्रमुखावर फक्त ऐकीव माहितीवरून एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद झाल्यास त्या व्यक्तीला आयुष्यभर मनस्ताप होत राहतो. ज्या व्यक्तीचा कसलाही दोष नसतानांही न्यायाच्या प्रतीक्षेत आयुष्यभर राहावे लागते. भविष्यात त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याला न्याय मिळेल की नाही. याची खंत त्यांच्या मनात घर करून राहते. त्यामुळे ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये राहते. त्या व्यक्तिच्या मनात विविध शंका उपस्थितीत होत राहतात. आपले काय होईल? काय होणार नाही? यांचा विचार करत असतो. त्याचे आयुष्यात नैराश्य येवून स्वतः बरबादीच्या खाईत ढकलला जातो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा दाखल करत असताना त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण करून अन्याय करणाऱ्या व्यक्तीचे मन परिवर्तन करावे. तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या वाद निदर्शनास आणून दिल्यास त्या व्यक्तीच्या गुन्हेगारीबद्दल पार्श्वभूमी माहीत होऊ शकते. त्या संदर्भात व्यक्तीची पूर्ण माहिती होईल आणि त्याच्यावरील गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल होणार नाहीते. अशी सूचना समाजसेवक सुरेश पाटील यांनी पोलीस स्टेशनला दिली.


stay connected