चंदनमल भळगट प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळा संपन्न.

 चंदनमल भळगट प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळा संपन्न.



कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित  चंदनमल भळगट प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न. या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे इयत्ता सातवीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, यामध्ये प्रामुख्याने प्राजक्ता रामगुडे, इथापे काव्यांजली, एकशिंगे प्रणिता इत्यादी विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले, तसेच या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सार्थक ढोबळे या विद्यार्थ्यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री नवनाथ पडोळे यांनी भूषवले तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  माजी मुख्याध्यापक श्री सुभाष धुमाळ हे उपस्थित होते तसेच संस्थेचे प्रतिनिधी म्हणून श्री सोभाचंद ललवाणी उपस्थित होते, तसेच मोतीलाल कोठारी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मथाजी शिकारे,अमोलक युनिव्हर्सल स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती. सुप्रिया महामुनी, श्री रोहन गांधी, श्री. रसिकशेठ श्रीश्रीमाळ ,बन्सीलाल मोहनलाल शिशुविहार च्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनवणे मॅडम, कुलकर्णी मॅडम चंदनमल भळगट प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा चौधरी,  तसेच श्री. दळवी हे उपस्थित होते.

हा सत्कार समारंभाचा उद्देश शाळेतील इतर विद्यार्थ्यांना स्पर्धा तसेच इतर सर्व परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी व यश प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन मिळणे हा असतो. व हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व  संचालकांचे सहकार्य लाभले.



या कार्यक्रमात जवाहर नवोदय साठी निवड झालेले 2 विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक 5 विद्यार्थी व पात्र 12 विद्यार्थी, मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यस्तरीय गुणवंत यादीतील 14 विद्यार्थी तसेच सायन्स व मॅथ ऑलिपीयाड मधील सहभागी 63 विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी माजी मु.अ. श्री सुभाष धुमाळ,श्री बबन घोंगडे, श्री मथाजी शिकारे, श्री नवनाथ पडोळे, श्री रेवणनाथ गदादे इत्यादी व्यक्तींनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदित्य आंधळे या विद्यार्थ्याने मानले, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदनमल भळगट प्राथमिक च्या मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा चौधरी मॅडम, श्री. रावल गणेश,  श्रीमती.अमृता रणदिवे,श्रीमती. ज्योती काकडे,  श्री.रेवणनाथ गदादे, श्री.सागर थोरात, श्रीमती.स्वाती राऊत, श्री.प्रशांत पठाडे, श्री.मच्छिंद्र गोरे, श्रीमती.ज्योती शेळके, श्री.विशाल पवार, श्रीमती.विद्या शिंदे व कर्मचारी श्रीमती. सारिका शर्मा व श्री. जाधव सचिन इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.