आ.सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नातुन पाझर तलावासाठी ३.७९ कोटी रुपये मंजूर सरपंच संदिप खाकाळ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

 शब्द पाळणारा नेता म्हणजे आमदार सुरेश आण्णा धस - सरपंच संदीप खाकाळ



आ.सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नातुन पाझर तलावासाठी ३.७९ कोटी रुपये मंजूर
सरपंच संदिप खाकाळ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश 





कडा- सतत दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या या आष्टी तालुक्यात हरितक्रांती घडविण्यात राज्यमंत्री आ.सुरेश आण्णा धस मोठा हातभार आहे. सतत आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी अहोरात्र प्रयत्न करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी सतत प्रयत्न करत आहेत काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील शेरी बु येथे झालेल्या वनराई व एल.अँड टी.टी.एस च्या माध्यमातून आष्टी तालुक्यातील शेरी बु या ठिकाणी झालेल्या विविध विकास कामाच्या कार्यक्रमात आ.सुरेश धस गावातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी जिल्हा शाळा व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला पाझर तलाव साठी दिला होता तो दिलेला शब्द पाळल्याचे चित्र दिसत आहेत. तालुक्यातील शेरी बु हे गाव जलमुक्ती कडून जलयुक्त करण्यासाठी आ. सुरेश धस यांनी तब्बल ३.७९ कोटी रुपये मंजूर केला आहे यासाठी सरपंच संदिप खाकाळ यांनी कित्येक वर्षांपासून आ. धस यांच्याकडे सतत पाठपुरावा करून गावाच्या रखडलेल्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देत गावच्या पूर्वेकडील असलेल्या ओसाड माळरानावर जवळपास चार कोटी रुपये चा पाझर तलाव मंजूर केला असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी लागणारा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. याशिवाय अनेक विविध विकास कामाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रपंचांना सावरण्यासाठी तालुक्यातील राजकारणात सक्रिय असताना ठोस उपाययोजना करण्याचा आ.धस दिलेला दिलासा कित्येकांच्या आशा पल्लवीत करणारा आहे. या पाझर तलावामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात हरितक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना व्यक्त होत आहे

 

जनतेच्या मनात घर करणारा नेता

आष्टी तालुक्यात सध्या जोमात सुरू असलेला विविध भागातील विकास पाहिल्यानंतर या विकास रथाचे सारथ्य करणारे आ.सुरेश धस यांची कार्यपद्धती पाहता त्यांनी आमच्या गावासाठी जिल्हा परिषद शाळेसाठी ४० लक्ष अन पाझर तलावासाठी जवळपास ४ कोटी रुपये, शेरी मांडवा रस्ता कामाला ४ कोटी, आरोग्य उपकेंद्राच्या कंपाऊंड साठी १० लाख मंजूर झाले असून लवकरच पाझर तलावाचे काम सुरु होणार आहे त्यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्याचे कष्टकऱ्यांचे स्वाभिमानाने उर भरून आल्याशिवाय राहाणार नाही. आपला साधेपणा जपत, प्रत्येकाच्या मनात आपल्या नावाचं घर निर्माण केलं आहे. यासाठी प्रचंड कष्ट,त्याग, समर्पण या गोष्टींमधून तावून-सुलाखून आपलं वेगळं नेतृत्व सिद्ध करत आपल्या नावाची वेगळी छाप पाडली आहे.अशी भावना व्यक्त होत आहेत.

   श्री. संदिप खाकाळ

सरपंच शेरी बु !!








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.