आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम रत्नदीप बाबत विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न मांडणार - आ. रोहीत पवार

 आंदोलनाचा सातवा दिवस

आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम रत्नदीप बाबत विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न मांडणार - आ. रोहीत पवार 



      - - - - - - - - - - - - 

जामखेड - जामखेड येथील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन सोमवारी (दि.११) आमदार रोहित पवार यांनी कैफियत ऐकून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना रडू कोसळले. आंदोलनस्थळी पाच तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, रत्नदीपबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    रत्नदीप फौंडेशनच्या अध्यक्षाच्या शैक्षणिक, आर्थिक, माणसिक, शाररीक पिळवणूकमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवशी आ. रोहीत पवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी खुली चर्चा सुमारे साडेचार तास केली. चार मुद्दयावर विद्यापीठ प्रतिनिधीनी कुलगुरू समवेत होणाऱ्या मिटींग नंतर निर्णय घेतले जातील असे अश्वासन दिले परंतु विद्यार्थ्यांनी निर्णय होई पर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.



       रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्यावर रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप करून सोमवारी सातव्या दिवशी आंदोलन चालू आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आ. रोहित पवार व अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे आंदोलन स्थळी आले. यावेळी मुलीनी संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनी शैक्षणिक, माणसिक व शाररीक अत्याचार कसे केले याबाबत माहिती सांगताना रडू कोसळले.

      आ. रोहित पवार यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना आंदोलनातील पाच सहा मुली अत्याचार कसे केले याबाबत महीला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव यांना सांगतील त्याप्रमाणे वेगवेगळे गुन्हे दाखल करावे तसेच अर्थीक लुट करताना कोरे बॉंड घेतले याबाबत सावकारकीचा गुन्हा दाखल करावा अशा सुचना दिल्या. पोलीस उपअधीक्षक वाखारे जामखेड मध्ये थांबून महिला अधिकारी यांच्या मार्फत गुन्हे दाखल करतील व तक्रार कर्त्या मुलींचे नाव गोपनीय राहतील याची काळजी घेण्याची विनंती केली. 

      कर्जत जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी सदर संस्थेचे डॉ भास्कर मोरे याने हरीण पाळले व जखमी अवस्थेत संस्थेच्या आवारात सापडले याबाबत तसे व्हिडिओ, फोटो प्राप्त झाले त्यानुसार गुन्हा दाखल केला असून या गुन्हयात तीन ते सात वर्षे सजा असल्याचे सांगितले. संस्थेने पाच हरीण पाळले असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला परंतु व्हिडिओ व फोटोत दोन हरीण दिसत दुसरे हरीण पुरले असल्याचे समजल्यानंतर खोदकाम केले परंतु काहीच हाती लागले नाही तेथील एका कर्मचारी याला चौकशीसाठी घेऊन गुन्हा दाखल करू तसेच फौंडेशनच्या ट्रस्टच्या संचालकाना आरोपी करण्यात येईल असे सांगितले.

     लोणारे विद्यापीठ एच एस जोशी विशेष कार्यअधिकारी सलग्नीकरण एच एस जोशी, सहाय्यक कुलसचिव सावित्रीबाई फुले विद्यापीठ जयेश कोळी यांनी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नापैकी परिक्षा फॉर्म भरून घेतले जातील व शैक्षणिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी घेतली. 

विद्यार्थांनी आम्हाला शिकवले गेले नाही, प्रॅक्टीकल झाले नाही आम्ही परिक्षेत काय लिहायचे अशी बाजू मांडली तसेच आमची अतिरिक्त घेतलेली फी परत मिळावी. रत्नदीप कडून दुसर्‍या महाविद्यालयात समायोजन करणे, नोडल अधिकारी नियुक्त करणे, रत्नदीपची मान्यता रद्द करणे या बाबी विद्यापीठ कुलगुरू समवेत सकाळी अकरा वाजता बैठक आहे याबैठकीत अधिक माहिती घेऊन निर्णय घेतले जातील असे सांगितले पण विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही. तसेच डॉ. भास्कर मोरे याला २४ तासात अटक करण्याची मुदत संपली १०० घंटे झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. 

      महिला आयोगाकडून दखल 

      - - - - - - - - - - - - - - 

रत्नदीप संस्थेच्या अध्यक्षाकडून मुलींचे माणसिक, अर्थिक शाररीक, अत्याचारामुळे सुरू असलेल्या 

अंदोलनाची राज्य महिला आयोगाने स्वता:हून दखल घेतली आहे. आयोगाने अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जामखेडमध्ये सुरु असलेल्या या प्रकरणाबाबत पत्र लिहीले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १०(१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे व माहीती कळवण्यास सांगितले आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.