कृषीरत्न पुरस्कार प्राप्त विभूतींचा उद्या कडा येथे होणार सत्कार समारंभ

 *कृषीरत्न पुरस्कार प्राप्त विभूतींचा उद्या कडा येथे होणार सत्कार समारंभ*




---------------------------------------

आष्टी/प्रतिनिधी

कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा उद्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने महाराष्ट्र शासन कृषीरत्न पुरस्कार विभूतींचा युवा नेते जयदत्त धस यांच्या हस्ते सत्कार समारंभ होणार आहे.

आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील रहिवासी असणार्‍या श्रीमती विजया गंगाधर घूले यांना जिजामाता कृषी भूषन पुरस्कार २०२१,तसेच दौलावडगांव येथील रहीवासी असणारे कृषी भूषण बाबासाहेब नानाभाऊ पिसोरे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार २०२१,राजू भाऊसाहेब सूपेकर, तालुका कृषी अधिकारी जामखेड यांना पदमश्री द.विठ्ठलराव विखे पाटील कृषीरत्न सेवा पुरस्कार २०२२, त्याचबरोबर केशव श्रीरंग रसाळ यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार २०२० अशांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल या सर्वांचा  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उद्या दिनांक ७ मार्च रोजी साडे अकरा वाजता सत्कार समारंभ आयोजीत करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व आयोजक रमजान तांबोळी व उपसभापती नामदेव धोंडे यांनी दिली आहे.













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.