महिलांचे सक्षमीकरण होण्याची काळाची गरज - प्राजक्ताताई धस आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद - ॲड प्रज्ञा खोसरे

 महिलांचे सक्षमीकरण होण्याची काळाची गरज
 - प्राजक्ताताई धस
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद - ॲड प्रज्ञा खोसरे 




आष्टी येथे नारी सन्मान पुरस्काराने कर्तबगार २६ महिलांचा सन्मान



आष्टी। प्रतिनिधी

महिलांनी चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता मुलांच्या शिक्षणाकडे तसेच कौटुंबिक आर्थिक परिस्थितीच्या प्रगती करण्यासाठी महिलांनी पुरुषाच्या बरोबर आपला संसाराचा गाडा अधिक जोमाने न्यायला पाहिजेत. तसेच आपल्या मुलामुलींच्या शिक्षणासह सोबत संस्काराकडे लक्ष दिले पाहिजे. आज महिला सर्वच क्षेत्रात प्रगती करत असून देश महासत्ता होण्यासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील महिलांनी व्यवसायासह अत्याधुनिक शेती व नोकरी आदी क्षेत्रात आपले स्थान अधिक मजबूत करणे गरजेचे आहे आणि महिलांचे सक्षमीकरण व सशक्तीकरण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महानंदा दूध संघ मुंबईच्या संचालिका प्राजक्ताताई सुरेश धस यांनी आष्टी येथे केले.



आष्टी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने शनिवार दि ९ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त २६  कर्तबगार महिलांचा राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्कार सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महिला आयोगाच्या सदस्या ॲड प्रज्ञा खोसरे, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, पोलिस उपअधीक्षक शुभदा घोगरे, गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, वैद्यकीय अधीक्षक डॉ राहुल टेकाडे,  एकात्मिक बालविकास अधिकारी अंजली वाघमारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष शालीणी परदेशी, उद्योजक अजय कापरे, अॅड. रिजवान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्राजक्ता धस म्हणाल्या की, युवा पत्रकार संघ  नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी तळागाळातील महिलांचा सन्मान करून एक स्तूत्य उपक्रम राबवत आहेत.

यावेळी बोलताना महिला आयोगाच्या सदस्या ॲड प्रज्ञा खोसरे म्हणाल्या की, बालविवाह रोखण्यासाठी पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे त्यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायद्यांची माहिती सर्व पालकांपर्यत पोहचून याबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे बालविवाह रोखले जातील.

 आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मान केला. महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे महिला अत्यंत धाडसी कामे करतात.पुरूषाच्या बरोबरीने आज महिला काम करत आहेत.तळागाळातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान युवा पत्रकार संघाने केला त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपअधीक्षक शुभदा घोगरे, सुधाकर यादव, अंजली वाघमारे,अजय कापरे आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष निसार शेख, सचिव जावेद पठाण, कार्याध्यक्ष अक्षय विधाते, संघटक अतुल जवणे, कोषाध्यक्ष आण्णासाहेब साबळे, गहिनीनाथ पाचबैल, प्रेम पवळ,समीर शेख, संतोष नागरगोजे, संतोष तांगडे, किशोर निकाळजे, दादा पवळ,राजु मस्के, संतोष दाणी,बा म पवार, राजेंद्र लाड, शहानवाज पठाण, अमोल जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसार शेख यांनी केले तर या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन डॉ अनिता चव्हाण यांनी केले व आभार अविनाश कदम यांनी मानले.




या महिलांचा झाला पुरस्काराने सन्मान...


जनाबाई आनंदराव बनसोडे, शुभदा घोगरे/चव्हाण, विजया गंगाधर घुले, विद्या संतोष चव्हाण,सीमा दिगंबर वालेवाडीकर/ कांबळे, नंदाताई पांडुळे, डॉ. प्रियंका सिंघन, श्रीमती संजना रावसाहेब गाढवे, प्रा. डॉ. काझी तनवीर बेगम हाफिजोदिन,  सुनीता भोपळे, सोनल शिवलाल गायकवाड, ॲड. सय्यद अतीया ताहेर, शोभा पगारे, दिपाली हरिभाऊ पोकळे, खान यास्मिन, सुनिता थोरवे, उषा जगदाळे, म्हसोबा महिला शेतकरी गट पारोडी, निशा आदक, सुजाता देवराव जाधव, वंदना नवनाथ खिलारे, पत्रकार गीतांजली लव्हाळे, तनिष्का महिला बचत गट देवळाली,रोहिणी रमाकांत पोतदार,अमूल्या यादव,साईश्री दातीर या विविध क्षेत्रातील महिलांना शाल, वृक्ष, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व फेटा बांधून 'नारी सन्मान २०२४' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.



युवा पत्रकार संघाचा आदर्श इतरांनी घ्यावा - प्रमोद कुदळे


युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी आष्टी तालुक्यात सामाजिक शैक्षणिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले. गरीब अनाथ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवन आनंदमय केले. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. अनेक महिला ह्या उत्कृष्ट कार्य करून ही त्यांची दखल घेतली गेली नव्हती. आज युवा पत्रकार संघाने कर्तुत्वान महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान करून त्यांना न्याय दिला. त्यामुळे युवा पत्रकार संघाचा आदर्श इतरांनी घ्यावा असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांनी केले.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.