धानोर्‍याजवळ दुचाकी अपघातात एक ठार एक गभीर जखमी

धानोर्‍याजवळ दुचाकी अपघातात एक ठार एक गभीर जखमी



धानोरा (वार्ताहर ) - अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जन ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नगर - जामखेड रोडवरील धानोरा ते बाळेवाडी फाट्याच्या दरम्यान घडली .

आष्टी तालुक्यातील बाळेवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने होंडा मोटार सायकल क्रमांक MH 23 BF 9380 ला जोराची धडक दिल्याने दुचाकी रस्त्यालगतच्या खड्यात 70 फुट उडून पडली या अपघातात टुव्हीलर चालक शंकर हिरामन गदादे वय 30 हा युवक जागीच ठार झाला तर मुंज्याभाऊ देवकाते वय 30 हा युवक गंभीर जखमी झाला .  गंभीर जखमी युवकाला अहमदनगरला उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

तर मयत युवकाचे शवविच्छेदन करण्यासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे .

समजलेली माहिती अशी की, रविवार दि. 10 मार्च च्या पहाटे मोटारसायकल स्वार शंकर गदादे व मुंज्याभाऊ देवकाते राहणार राक्षसवाडी वय ३० वर्षं हे नगरहुन येत असताना बाळेवाडी फाटया जवळ अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला . घटनेची माहीती कळताच अंभोरा पोलिस कर्मचारी बाजीराव गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णवाहिकेने अहमदनगर येथे पाठवले . यावेळी रुग्णवाहिका चालक राजू गायकवाड आणि प्रविण ढवण यांनी मोलाचे सहकार्य केले. 

या अपघातामुळे येथील वळणरस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे . यापूर्वीही याच ठिकाणी अनेकदा अपघात घडले असुन शेकडोंचे बळी येथे गेले आहेत . याठीकाणी संरक्षक कठडे बनवीणे अत्यंत गरजेचे असुन रस्ते प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे .











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.