माजी आ. भीमराव धोंडे यांच्या हस्ते आज विद्यापीठाचा पदवीदान समारंभ
कडा ( वार्ताहर):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर संलग्नित आनंद चॅरिटेबल संस्था आष्टी संचलित, कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते आज सोमवारी दिनांक ११ मार्च २०२४ रोजी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न होणार आहे अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्या परिषद व अधिसभा सदस्य व प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांनी दिली.
यावेळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अजयदादा धोंडे, माणिकदौंडी येथील महादेवगडाचे
महंत आदिनाथ महाराज आंधळे तसेच सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी पांडुरंग जाधव (गुरुजी) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख उपस्थितीतांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी उपप्राचार्य डॉ. भास्कर चव्हाण, उपप्राचार्य डॉ. बापु खैरे, उपप्राचार्य डॉ. संभू वाघुले उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक डॉ. पी. एन. औटे, डॉ. डी. बी. बोराडे, डॉ. एस. डी. ओव्हाळ, आय. जी. नन्नवरे, डॉ. एम. जी. राजपंगे, डॉ. जी. पी. बोडखे यांनी केले आहे.



stay connected